सम्राट मित्रमंडळाचे आंदोलन
अहमदपूर दि.१५
तालूक्यातील निराधार, अपंग,विधवा,
परितक्त्या यांचे अनूदान पूर्ववत चालू करावे,योजनेतील अन्यायकारक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालया समोर धरणे निदर्शने तीव्र अंदोलन करण्यात आले.
शासनाच्या वतीने निराधार, विधवा,अपंग,
परितक्त्या यांना अनूदान मंजूर केले जाते.आज घडीला अहमदपूर तालुक्यामध्ये जवळपास 10915 इतक्या लाभार्थ्यांना अनूदान मिळते.मात्र मा. जिल्हाधिकारी साहेब लातूर यांनी नूकतेच एक अशासकीय पत्र देवून शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.
या आदेशामूळे सबंध तालूक्यातील या लाभार्थ्यांमध्ये आपले अनूदान बंद होत असल्याची भावना निर्माण झालेली आहे.
तसेच सदरच्या आदेशामुळे दारिद्र्य रेषेखालील यादीचे प्रमाणपत्र,नसेल तर 21 हजार उत्पन्नाचे प्रमाणपत्र,जीवंत असल्याचे(हयातीचा प्रमाणपत्र) 15 जून 2022 पर्यंत कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले आहे.

वास्तविक पहाता दारीद्य्र रेषेखालील सर्व्हे हा गेल्या बारा वर्षात झालेला नाही,सर्व्हे मध्ये अनेक नांवे हे सदोष असून ही नावे दुरूस्तीचे अधिकार स्थानीक स्तरावर नाहीत.नव्या शासकीय परिपत्रकानुसार दारीद्य्र रेषेखालील यादी शिवाय किंवा 21 हजारच्या आत वार्षिक उत्पन्न असल्याशिवाय हे अनूदान मंजूर करता येत नाही.21 हजाराचे आतील उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी खूप मोठ्या प्राणात अडचणी आहेत.किंबहूना असे प्रमाणपत्र सहजासहजी देण्यात येवू नये अशा प्रशासनाच्या सूचना असल्याचे समजत आहे.
या सर्व बाबींमुळे सर्व निराधार,वयोवृद्ध,अपंग,विधवा,परितक्त्या हे सैरभैर झाले आहेत. तहसिल कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,ग्रामपंचायत कार्यालय,तलाठी कार्यालय,मंडळ अधिकारी कार्यालय,नगर परिषद येथे चकरा मारत आहेत.या सर्वांची मोठी कुचंबणा व तारांबळ होत आहे.
त्यामूळे आज सम्राट मित्र मंडळाच्या वतीने या अन्यायाच्या विरोधात यूवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र धरणे आणी निदर्शने अंदोलन करण्यात आले.तसेच या बाबत तहसिलदार यांच्या निवेदन देण्यात आले.यात प्रामुख्याने
अहमदपूर तालूक्यातील अपंग,निराधार,विधवा परितक्त्या यांचे शासकीय अनूदान कुठल्याही परिस्थितीत बंद करू नये.या सर्व लाभार्थ्यां कडून नव्याने उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दारिद्रय़रेषेखालील प्रमाणपत्र घेवू नये.जर शासकीय आदेशाप्रमाणे कांही प्रमाणपत्राची आवश्यकता असेल तर प्रशासनाने स्वतः पूढाकार घेवून लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र यंत्रणेकडून हस्तगत करून घ्यावे.सदरचे कागदपत्रे जमा करण्याचे आदेश रद्द करावेत,नसेल तर मुदतवाढ देण्यात यावे. सदरचे शासकीय अनूदान रितसर वाटप करण्यासाठी वेळोवेळी स्थानिक पातळीवरील येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात.
नवीन लाभार्थ्यांची निवड करताना स्थानिक पातळीवर वयाचे प्रमाणपत्र घेतले असताना लातूर येथील मेडीकल बोर्डाचे प्रमाणपत्र मागविण्याचे अन्यायकारक बेकायदेशीर निर्णय तातडीने रद्द करावे.
या अनुदानाच्या संदर्भात येणाऱ्या कूठल्याही अडचणी बाबत कालमर्यादेत म्हणजे किमान आठ दिवसात निर्णय घ्यावा जेणे करून लाभार्थ्यांच्या चकरा,पिळवणूक थांबेल.संबंधीत विभागात काम करण्यासाठी आवश्यक्त ते मनुष्यबळ,तातडीने पुरवावे तसेच या विभागात काम करणाऱ्या संबंधीत करणार्यां संबंधी अनेकांच्या तोंडी तक्रारी आहेत.तरी येणाऱ्या लाभार्थ्यांना सौजन्याची वागणूक देण्याबाबत समज देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

या प्रसंगी माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे,अण्णाराव सूर्यवंशी,मूकूंद वाघमारे,
नरसिंग परतवाघ,प्रशांत जाभाडे,मुख्याध्यापक मदने सर आदींची भाषणे झाली.
सूत्रसंचालन पत्रकार अजय भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास भालेराव यांनी मानले.
या अंदोलनात हजारों वयोवृद्ध अपंग,निराधार बांधवांची उपस्थिती होती.