निटूर-(प्रशांत साळुंके)-निलंगा तालुक्यातील निटूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने चेअरमन कालिदास पाटील व व्हाईस चेअरमन दिनकर निटूरे यांच्या हस्ते शेतकरी सभासद राजकुमार भदरगे यांच्या मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी एकूण 20 लाख रूपयांचे कर्ज सुपुर्द करण्यात आले.
चेअरमन कालिदास पाटील व व्हाईस चेअरमन दिनकर निटूरे यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज वाटप करत असताना म्हणाले,सहकार महर्षी दिलीपराव देशमुख,माजी पालकमंञी अमित देशमुख,लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन धीरज देशमुख,संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून आम्हाला शेतकर्यांच्या मुलाच्या शैक्षणिक हितासाठी घेतलेला निर्णय विधायक असल्याने त्यांचे आभार मानले आहेत.तसेच व्ही.के.मेडीकल काॅलेज अहमदनगर येथे राजकुमार भदरगे यांचा मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
प्रसंगी संचालक राजकुमार सोनी,शाखा तपासनीस नायब सचिव एम.बी.कांबळे,सहसचिव पांडूरंग नाईक,कमलाकर सोमवंशी आदी जणांची उपस्थिती होती.