निटूर येथील लड्डा परिवार यांनी नर्मदा परिक्रमा पार करून आल्याने गावातील भाविक-भक्तांनी मिरवणुक काढून जंगी स्वागत केले..
निलंगा-(प्रशांत साळुंके)-निलंगा तालुक्यातील निटूर येथील हभप विरनाथ महाराज लड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत नर्मदा परिक्रमा पार करून गावातील भाविक-भक्तांनी मिरवणुक काढून त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.तसेच हभप मल्लिनाथ महाराज लड्डा व गोरखनाथ महाराज लड्डा यांचाही सपत्निक सत्कार या मिरवणुकीमध्ये करण्यात आला.
नर्मदा परिक्रमा तब्बल तीन हजार किलोमिटर पार करत पायी नर्मदा परिक्रमा करण्यात एकशे आठ दिवस लागले आहे.सर्वात मोठी नर्मदा परिक्रमा पार केल्याने निटूर गावातील लड्डा परिवाराने नर्मदा परिक्रमा केल्याने लातूर जिल्ह्यात आदर्शवत असल्याचे निश्चित झाले आहे नर्मदा परिक्रमा हे त्यागाचे समर्पणाचे प्रतिक आहे.त्यामुळे येथील लड्डा परिवार आणि त्यांच्या भाविक-भक्तांच्या समावेत ही नर्मदा परिक्रमा याञा पायी जाऊन आल्याने त्यांचा यथोचित सपत्निक सत्कार करण्यात आल्याने गावातील मारूती मंदिरासमोर त्यांची मिरवणुक काढून गावातील मोठ्यासंख्येने भाविक-भक्त उपस्थित होते.याप्रसंगी त्यांचा सपत्निक फेटा शाल श्रीफल देवून सत्कार करण्यात आला.
हभप मल्लिनाथ महाराज लड्डा हभप विरनाथ महाराज लड्डा हभप गोरखनाथ महाराज लड्डा यांनी नर्मदा परिक्रमातील पायी चालण्याचा अनुभव सांगताना म्हणाले की, ही नर्मदा परिक्रमा त्यागाचे समर्पणाचे प्रतिक घेऊन आम्ही ही नर्मदा परिक्रमा आपल्या गावातील भाविक-भक्तांच्या आशिर्वादाने चांगली झाल्याचे सांगितले.तसेच आम्ही लड्डा कुटुंबातील सदस्य आणि भाविक-भक्तांसमावेत ही नर्मदा परिक्रमा तब्बल तीन हजार किलो मिटर पायी चालत आम्हाला एकशे आठ दिवस लागल्याचे त्यांनी सांगितले ही नर्मदा परिक्रमा आम्हाला प्रेरणादायी आणि समर्पण करण्यासाठी चांगली झाल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदर अशा नर्मदा परिक्रमा अनेक भाविक-भक्तांनी करून आपल्या जीवनातील सार्थक झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे पायी नर्मदा परिक्रमा ही जीवनाचे त्याग आणि समर्पण असल्याचेही त्यांनी सांगितले आहे आम्ही नाथसंस्थान औसेकर महाराजांचे शिष्य असल्याने ही नर्मदा परिक्रमा यशस्वी झाली आहे.