सहकारमहर्षी तथा माजीमंञी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाला..
निलंगा-(प्रतिनिधी)-निटूर येथील जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी पेट्रोलियम सर्व्हिसेसचा भव्य शुभारंभ उद्रघाटक सहकारमहर्षी तथा माजीमंञी दिलीपराव देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सहकारमहर्षी तथा माजी मंञी दिलीपराव देशमुख यांनी उद्धाटक प्रसंगी बोलताना म्हणाले,या गोदावरी पेट्रोलियम सर्व्हिसेस ( नायरा ) पेट्रोल आणि डिझेल मिळणारा स्वच्छ पेट्रोल पंप असणारा सर्वोत्तम दर्जाचा पंप विकसित झाल्याने सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. तसेच,याठिकाणी आपण उत्तम दर्जाचा नायरा पेट्रोल पंपाची सेवा ही उत्तम दयावी आपण यासेवेकरिता स्वत: लक्ष देणे आवश्यक असल्याचेही सांगितले आहे.या पेट्रोलपंपाची भरभराटी निश्चित असल्याने देशमुख कुटुंबाला माझ्याकडून शुभेच्छा असल्याचे सांगितले.

प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी सहकारमहर्षी तथा माजी मंञी दिलीपराव देशमुख ज्या ठिकाणी उद्रघाटक म्हणून असतात त्याठिकाणी लक्ष्मी भरभराटीने येत असते म्हणून गोदावरी पेट्रोलियम सर्व्हिसेसला माझ्याकडून शुभेच्छा असल्याचे सांगितले.
यावेळी अभिजित देशमुख,काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण जाधव,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख,गणेश होळे,राजकुमार सोनी,व्हा.चेअरमन दिनकर निटूरे,सुरेंद्र धुमाळ,रमेश मोगरगे,बालाजी भुरे, प्रताप पाटील, प्रकाश देशमुख,विश्वास देशमुख,दत्ता देशमुख,अमर देशमुख होते.
