राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आ.बाबासाहेब पाटील यांच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय होण्यासाठी नवस ; आत्या पद्मावती विश्वंभर मोरे यांनी भव्य नागरी सत्कारात पेढेतुला करून फेडला..
निलंगा-( प्रशांत साळुंके )-अहमपूर विधानसभा मतदारसंघातील आ.बाबासाहेब पाटील हे निलंगा तालुक्यातील निटूर येथील त्यांच्या आत्या पद्मावती विश्वंभर मोरे यांनी आपल्या बाबासाहेब पाटील यांच्या 2019 विधाससभा निवडणुकीत विजय होण्यासाठी आपण नवस बोलले होते त्याची पुर्तता त्यांनी निटूर येथे आ.बाबासाहेब पाटील आल्यानंतर ग्रामदैवत श्री सादनाथ महाराजांच्या चरणी हे नतमस्तक होवून दर्शन घेतले आणि भव्य नागरी सत्कारात आत्याच्या मनातील पेढेतुला करून नवस फेडण्यात आला.तसेच त्यांनी ग्रामदैवत श्री सादनाथ महाराजींची पुजाही केली.
ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज विश्वस्त समितीच्या वतीने आ.बाबासाहेब पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या सत्कारा प्रसंगी बोलताना म्हणाले, आत्याने केलेला नवस फेडला ; परंतु उपकाराची परतफेड करू शकत नाही निटूर हे माझ्या आत्याचे गाव. आई-वडिलांच्या पश्चात माझं पालकत्व माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब व माझ्या आत्यांनी केलं. त्या त्यांपैकी पद्मावती विश्वंभर मोरे आत्या ही एक. बऱ्याच काळानंतर आत्याच्या गावाला जाण्याचा योग आला. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माझा विजय व्हावा, यासाठी आत्यांनी नवस बोलला होता. आज हा पेढेतुला नवस पूर्ण करण्यासाठी मी निटूर येथे माझी उपस्थिती होती.
तसेच,आदरणीय जाधव साहेबांबरोबर माझ्या आत्याबाईंनी मला अगदी स्वतःच्या मुलासारखा जीव लावला. आज आत्याने कुरवाळल्यावर जितका आनंद मनाला मिळाला तो शब्दांत व्यक्त करु शकत नाही. त्यांचे माझ्यावर असणाऱ्या उपकाराची परतफेड करू शकत नाही. मी जो काही आहे तो त्यांच्या पाठबळामुळे आहे. त्यांच्या पुण्याईमुळेच मी आजवर यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकलो. ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात भव्य नागरी सत्कार तसेच पेढेतुला कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सर्व ग्रामस्थांचे आभार मानत माझ्या आत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केले.
याप्रसंगी चाकूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, तानाजी पाटील,मुख्याध्यापक अनिल सोमवंशी, सरपंच सौ.प्रतिभाताई सोमवंशी,उपसरपंच शिवराज सोमवंशी, दिनकर निटूरे, प्रविण कवटकर, धर्मानंद कांबळे, उद्धव मेकाले,जाधव,प्रा.संतोष सोमवंशी,दिलीप देशमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी गावातील मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित होते.