वाढदिवस विशेष
२१ मार्च आज राज्याचे वैदयकीय शिक्षणमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस आहे. सन १९९७ पासून सुरू झालेल्या राजकीय प्रवासाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. एका अर्थांने ना. देशमुख यांच्या जनसेवेतील राजकीय प्रवासाचा हा रौप्य महोत्सव आहे. ना. अमित विलासराव देशमुख केवळ एक राजकीय व्यक्तिमत्व नाही तर लातूरकरांशी आणि राज्यातील युवकांशी जिव्हाळयाने जोडलेल नाव आहे. राजकारणाचा श्रीगणेशा युवकांना पुरोगामी विचाराशी जोडण्यासाठी संघटन आणि विलासराव देशमुख युवा मंचच्या विधायक कामातून केला आहे. यासाठी ग्रामीण भाग, शेती, शेतकरी यांच्या उन्न्तीसाठी सहकार चळवळीच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली उभारलेले विलास सहकारी साखर संकूल आणि टवेन्टिवन शुगर्स ली. प्रकल्प शेतकरी, सहकार चळवळ आणि लातूरच्या प्रगतीसाठी वरदान ठरलेले आहेत. राज्याच्या पातळीवर जेव्हा जेव्हा सरकामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते तेव्हा मोठया प्रमाणात विकासनिधी खेचून आणून त्यांनी संधीचे सोने केलेले आहे.
एक कुशल संघटक, मुत्सददी, धोरणी, अमोघ वक्तृत्व आणि संभाषण चातुर्य लाभलेल, काळानुरूप सुसंगत उपक्रम राबविणारा उपक्रमशील, कलासक्त, गुणग्राही, उत्कृष्ट प्रशासक, सहकार मंत्र जाणणारा, लोकसंपर्काची आवड असलेल लोकविलक्षण अष्टपैलू गुणांचा समुच्चय म्हणजे ना. अमित विलासराव देशमुख होय, आज त्याचा वाढदिवस निमीत्त मनपुर्वक शुभेच्छा. |

- अष्टपैलू नेतृत्व
ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वैचारीक बांधणीचा पाया पक्का आहे. ही बांधिलकी सामान्य माणसाशी, पुरोगामी व प्रगतिशील विचारांशी आहे. या विचारांशी कायम नाळ ठेऊन त्यांची राजकारणात वाटचाल सुरू ठेवली आहे. लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख व माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे वैचारीक संस्कार आणि प्रेरणा, माजी राज्यपाल शिवराजजी पाटील चाकूरकर, दिवंगत केंद्रियमंत्री माधवराव सिदीया यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे नेतृत्वगूण घडले आहेत. त्यांचा राजकीय प्रवास पाहिला तर दिसून येते की, एक कुशल संघटक, राजकीय प्रवासात टीकून राहण्याचा मुत्सददीपणा, योजनांची आखणी आणि राबविण्यात धोरणी, लोकशाहीतील आवश्यक गुण असलेले अमोघ वक्तृत्व आणि संभाषण चातुर्य, काळानुरूप सुसंगत उपक्रम राबविणारा उपक्रमशील, सांस्कृतिक प्रातांत कलासक्त, एक कला रसिक, सहकारी निवडतांना गुणग्राही, उत्कृष्ट प्रशासक, लोकसहभाग आणि ग्रामीण विकासासाठी सहकार मंत्र जाणणारा, कृषी, ग्रामविकासातील समस्यांची जाणीव असलेला, सतत लोकसंपर्काची आवड असलेल हे त्यक्तिमत्व आहे. अशा लोकविलक्षण अष्टपैलू गुणांचा समुच्चय म्हणजे ना. अमित विलासराव देशमुख होय.
- समाजकारण राजकारणाचा पाया
आदरणीय विलासराव देशमुख यांचा आदर्श डोळयासमोर ठेऊन ना. अमित देशमुख यांनी राजकारण हे समाजसेवेच माध्यम मानून कार्य करण्यास सुरूवात केली. अठरापगड जातीची माणस त्यांचे जीवनमान सुखी आणि समृध्द करण्यासाठी सदैव कार्यरत आहेत. विविध जातीधर्माचे लोक समाजात राहतात हे सर्वजण गुण्यागोवींदाने राहीली पाहिजेत, त्यांच्यात एकतेचा हा धागा भक्क्म करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी व सर्वधर्म समभावाची समतेची विचारधारा त्यांच्या कृतीत आहे. राजकारणासाठी सामाजिक व्देष कधीही त्यांनी पसरवला नाही. यामुळे विविध जातीधर्माचे लोक पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी म्हणून त्यांचे सोबत आहेत.
लातूरच्या सर्वांगीण विकास प्रकी्रयेत योगदान देत असतांना प्रारंभी पासून रचनात्मक आणि शाश्वत विकासाची संकल्पना राबविली. ग्रामीण भागाचा विकास, शेतीसाठी सिंचन, जलसंधारण, वृक्षारोपन, शेतकऱ्यांना सोयीसुवीधा, स्थानीक ऊत्पादन ऊस, कडधान्यावर प्रक्रीया उदयोग, शेतीपूरक व्यवसायास त्यांनी चालना दिली. लातूरचा सर्वांगीण विकासास गती देण्यासाठी सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजीक, औद्योगीक, आर्थिक व बॅकीग आदी क्षेत्रात आपल्या स्वत:च्या कामाची संस्थेच्या माध्यमातून कल्पकतेने त्यांनी उभारणी केली आहे. समाजातील सर्व घटकांना समान संधी देणारी ही प्रक्रीया आहे. यासर्व क्षेत्रात त्यांनी उभा केलेले कामातून त्यांच्या नेतृत्वाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यात्या संस्थातील, क्षेत्रातील त्यांचे उपक्रम, योजना आणि कामकाज सर्वांसाठी प्रगतीस गती देणारे ठरले असून विकासाला नवी दिशा मिळाली आहे.
- स्वंयभू नेतृत्व

अमित विलासराव देशमुख यांना भक्कम असा राजकीय वारसा आहे. पण त्यांनी सुरूवातीपासून मार्गदर्शन, अनुभव आणि प्रेरणा म्हणून हा वारसा जपला आणि स्विकारला आहे. सार्वजनिक जीवनात वाटचाल करतांना मात्र स्वत:चे वेगळे काम त्यांनी उभा केले. यामध्ये सहकार आणि साखर उदयोगात विलास कारखाना, टवेन्टिवन शुगर, वित्तीय क्षेत्रात विलास बॅक, शैक्षणिक संस्थेत विलासराव देशमुख फाऊंडेशन अंतर्गत विविध संस्थाची उभारणी, गोल्डक्रेस्ट हाय संस्थाचा उल्लेख करता येईल. संघटनात्मक पातळीवर नवे युवा सहकारी जोडले, स्थानिक स्वराज्य संस्था, पक्षसंघटना व सहकारी संस्था माध्यमातून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. पहिल्यांदा आमदार ते आज वैदयकीय शिक्षण मंत्रीपदा पर्यंत काम करतांना वेगळया कामाची उभारणी त्यांनी केली. यामुळे राज्य आणि देशपातळीपर्यंत त्यांची ओळख ही त्यांच्या कामातून निर्माण झाली आहे.
- सहकार चळवळ आणि साखर उदयोग ग्रामविकासाचा कणा
आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख व सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी मांजरा साखर कारखाना माध्यमातून सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. हा कारखाना अत्यंत यशस्वीस्वीपणे चालवून शेतकरी आणि शेती विकासाच्या अनेक योजना राबविल्या. सहकार चळवळ आणि साखर उद्योगात मांजरा कारखान्याने शेतकऱ्यांशी बांधीलकी ठेवून कसे काम करावे याची एक चांगली परंपरा निर्माण केली आहे. ही परंपरा पूढे चालवत साखर उदयोगाच्या उभारणीतुन ना. अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या सार्वजनीक जीवनाची सुरूवात केली आहे. कारखाना उभारणी, कारखान्याची वाटचाल, कारखान्याचे कामकाज, कारखान्याचे उपक्रम आणि योजनाचे धोरण अत्यंत डोळसपणे आखले आहे. यामूळे कारखाना, सभासद शेतकरी कर्मचारी यांची प्रगती झपाटयाने झाली आहे. आधुनिक पध्दतीने कारखाना चालवीत असतांना व्यवस्थापकीय धोरण व्यवसायीक ठेवले, प्रशासकीय कामकाज गतीमान केले, साखर कारखान्याचे तंत्रज्ञान आधुनीक ठेवले आहे. विकास कारखान्याच्या माध्यमातून आधुनिकता व व्यवसायीकतेचा सुरेख साधला यामूळे हा कारखाना देशभर नावारुपाला आला आहे. साखर उद्योगाशी निगडीत सर्व घटकांची गुणवत्ता आणि उपयोगीता ही जागतीक दर्जांची ठेवली आहे. या कारखान्यास दुसरे युनीट सलग्न होवून कारखाना साखर संकूल झाला आहे. आता नव्या यूगाचे नवे पाऊल् टाकून अत्याधुनीक टवेन्टिवन शुगर लि. ची उभारणी केली आहे. या साखर उदयोगामुळे स्थानीक पातळीवर सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रोजगारनिर्मीती मोठ्या प्रमाणात झाली. उद्योगाचा तसेच विविध सहकारी संस्थाचा परीसराच्या विकासात महत्वाचा वाटा राहीला आहे, या सहकारी संस्थामुळेच लातूरमध्ये आर्थिक क्रांती झाली.
- ग्रामविकासाच मंत्रालय – स्थानिक स्वराज्य संस्था

लोकशाहीमध्ये शासनाचा पूढाकार त्यात लोकांचा सहभाग महत्वाचा असतो. हा लोकसहभाग वाढविण्यासाठी गाव आणि प्रभाग पातळी वरील संस्था महत्वाच्या असतात. लातूर तालुका समन्व समिती अध्यक्ष म्हणून काम करत असतांना पासून ना. अमित देशमुख यांना ग्रामीण भाग व ग्रामीण भागातील लोकजीवन व त्यांच्या समस्यांची जाणीव आहे. यामूळे स्थानिक स्वराज्य संस्था ते मंत्रालय माध्यमातून ग्रामविकासाचा एक निश्चीत अराखडा त्यांच्या समोर आहे. ग्रामीण भागात विकासाला गती देण्यासाठी, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, विकासयोजना राबविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाच्या आहेत. एका अर्थाने ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ग्रामविकासाच मंत्रालय आहे. या संस्था व सहकारी संस्थाच्या माध्यमातून कृषी विकासासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार केला, योजना राबविल्या. विविध उपक्रम राबविले. कृषीतज्ज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, सिंचन तज्ज्ञाचे मार्गदर्शन शेतकऱ्यासाठी उपलब्ध केले. राज्य आणि देशभरातील प्रगतीशील शेती व शेतीपूरक व्यवसायाची प्रत्यक्ष भेट शेतकयांना घेता यावी यासाठी उपक्रम आखले. मराठवाडा विशेषता लातूर जिल्ह्रात दिवसेदिवस पर्जन्य कमी पडून दुष्काळ पडत आहे. शेतीला पाणी अपूरे पडत आहे. यामूळे त्यांनी सर्व कारखान्या मार्फत पाणी व्यवस्थापनाचा प्रयोग, जलसंधारण, नदीचे खोलीकरण, रुंदीकरण योजना राबविल्या आहेत. या शिवाय ऊसशेती यांत्रीकीकरण, सेंद्रिय शेती, ऊसविकास योजना राबविल्या आहेत. लातूर जिल्हयात महत्वाच्या ठरलेल्या कृषी विकासासाठीचे विविध उपक्रम व प्रयोग हे स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थेतून ना. देशमुख यांनी राबविले आहेत हे विशेष.
- लोकसहभागातून विकासाची चळवळ

कोणतही नेतृत्व किती उपक्रमशील आहे, यावर त्या परीसरातील घडामोडी अवलंबून असतात. मराठवाडा विशेषता लातूर जिल्हयात सतत अभिनव उपक्रम राबविण्याचे काम ना. अमित विलासराव देशमुख यांनी गेल्या २५ वर्षामध्ये केले आहे. हे सर्व उपक्रम केवळ उत्सवी नाही तर प्रासंगिक आहेत. या सर्व उपक्रमामध्ये मोठया प्रमाणात लोकसहभाग वाढवून त्यांनी विकासाची चळवळच गतिमान केली आहे. लातूरमधील पाण्याची तीव्र टंचाई काळात विलासराव देशमुख फाऊंडेशन माध्यमातून जलवितरण सेवा, विविध संस्थाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार उपक्रम राबविला, जलपुर्नभरण, नदीचे खोलीकरण व रूंदीकरण, पर्यावरण संर्वधनासाठी लातूर वृक्ष माध्यमातून वृक्षारोपन, महाआरोग्य शिबीर, महारक्तदान शिबीर, लातूर फेस्टिव्हल, सामुदायीक विवाह सोहळा, क्रीडा स्पर्धां, रोजगार मेळावा असे विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
- कायदासुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य
येथील सामाजिक वातावरण अतिशय चांगले आहे. लातूरचे शिक्षण, बाजारपेठ, उदयोग या क्षेत्रात भरभराट आहे. या क्षेत्रात लातूरचा मोठा लौकीक आहे. हा लौकीक सांभाळण्यासाठी नेहमीच कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे. कधीही सामाजिक अपप्रवृत्ती, अनधिकृत व्यवसाय, समाजविघातक प्रवृत्तीला पाठीशी घातले जात नाही. सामाजिक सलोखा आणि येथील कायदा सुव्यवस्थेला नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. गेल्या पंचवीस वर्षाच्या सार्वजनीक जीवनात आरोपी, विध्नसंतोषी, समाजकंटक अशा व्यक्तीची पाठराखण करणारा एकही फोन पोलीस प्रशासनाला त्यांनी केला नाही. एवढी लातूरच्या कायदा सुव्येवस्थेशी बांधीलकी आहे.
- लातूरला प्रथम प्राधान्य

आदरणीय विलासराव देशमुख यांनी जे नव ते लातूरला हव हे ब्रिद मानून विकासाचा पहिला घास लातूरला दिला. आज हेच धोरण राज्याच्या पातळीवर काम करतांना ना. देशमुख यांनी स्विकारले आहे. यासाठी ना. अमित देशमुख यांनी प्रारंभी पासून गाव व प्रभाग पातळी पासून तसेच ग्रामपंचायत ते मंत्रालय अशी एक विकासप्रक्रीया चालविणारी साखळी निर्माण केली आहे. केंद्रसरकार आणि राज्यसरकारने आखलेल्या जनहिताच्या योजना प्रत्यक्ष राबविण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकारी यांच्या सोबत त्याचा सक्रीय सहभाग असतो. विशेषता लातूर मधील विकासाला गती आणि सामान्य माणसांचे जीवनमान उंचावणाऱ्या अनेक योजना स्थानीक पातळीवर प्रभावीपणे राबविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. याकरीता स्थानीक स्वराज्य संस्था, विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रशासनामार्फत नियोजनबद्ध प्रयत्न करुन लाभार्थी पर्यंन्त योजनेचे लाभ पूरविले. या योजनामध्ये अन्न सुरक्षा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महिला सक्षमीकरणासाठी, जननी सुरक्षा योजना, ग्रामीण भागात पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते, पाटबंधारे, गरींबांना घरे, पिण्यासाठी पाणी, विद्युतपूरवठा अशा भौतीक सुविधाच्या उभारणी योजना, दारिद्य रेषेखाली गरीब, वृद्ध, अंध, अपंग व निराधाराकरिता राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, आरोग्य ही मूलभूत यामूळे दारिद्र रेषेखालील व गरीब व्यक्तिना आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदतीची आवश्यकता असते. समाजाची ही गरज ओळखून महाराष्ट्र सरकारच्या वतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना प्रभावीपणे राबविली आहे. या सर्व योजना आणि उपक्रम राबवितांना प्रथम प्राधान्य त्यांनी कायम लातूरकरांना दिले आहे.
- प्रभावी लोकसंपर्क
राजकीय नेतृत्वाच्या पदाची वाटचाल ही लोकांच्या आशीर्वादाने वाढत असते. हा आशीर्वाद मिळवीणे, टिकवीणे आणि वाढविणे हे नेतृत्वगुणावर अवलंबून असते. ना. देशमुख यांनी राजकारण करायच ते विकासासाठी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे ध्येय डोळयासमोर ठेवले आहे. एक प्रभावी लोकसंपर्क ठेवण्याचा गुण त्यांच्यामध्ये आहे. लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी निवासस्थानी भेटीगाठी घेतात. या शिवाय नागरीकांच्या बैठका, पदाधिकारी व कार्यकर्ता बैठका, ग्रामभेट, प्रभाग भेट, स्नेह भेट, शिवार फेरी, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद असे अनेक लोकसंपर्काचे उपक्रम ही त्यांची दैनदिनी आहे. या माध्यमातून अनेक प्रश्नाचा निपटारा ते करतात. लोकांशी संवादासाठी पाठविलेल्या शुभेच्छा पत्रापासून सुरू झालेला हा प्रवास पाहता पाहता आज डिजीटल मिडीयांच्या महाजाला पर्यंत पोहचला आहे. पाणी टंचाई, दुष्काळ, नैर्सगिक आपत्ती काळात मदतीसाठी आणि कोरोना काळात लातूरकरांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून ‘चोवीस तास सात दिवस’ पालकमंत्री कार्यालय तत्पर असल पाहिजे ही त्यांची भूमिका आहे, ती त्यांनी प्रत्यक्ष् राबवीली.
ना. अमित विलासराव देशमुख यांची राजकीय वाटचाल लोकसेवेला समर्पित आहे एक विकासाची चळवळ आहे. ही वाटचाल आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या नेतृत्वाला वाढदिवसा निमित्त मन:पूर्वक लाख लाख शुभेच्छा.

—
राहूल हरिभाऊ इंगळे-पाटील
रा.करकट्टा ता.जि.लातूर
मोबाईल ९८९०५७७१२८