राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
लातूरकरांच्या वतीने स्वीकारला सन्मान
महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मानले आभार
लातूर/प्रतिनिधी: स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत जीएफसी ३ स्टार व ओडीएफ ++ शहराचा दर्जा प्राप्त केल्याबद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समस्त लातूरकरांच्या वतीने महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,आयुक्त अमन मित्तल,सहाय्यक आयुक्त श्रीमती मंजुषा गुरमे, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. लातूर शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. स्वच्छ व सुंदर,आरोग्यदायी लातुरचा ध्यास घेऊन मनपा काम करत आहे.मनपाच्या या उद्दिष्टाला समस्त लातूरकरांनी आजवर भरभरून सहकार्य केलेले आहे.

लातूर शहरातील नागरिकांनी मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कचरा वर्गीकरण करून घंट्यागाड्यांकडे सोपवला. यामुळेच शहर स्वच्छ होऊ शकले. मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प राबवला.या सर्व कार्याची दखल घेत लातूर शहराला जीएफसी ३ स्टार व ओडीएफ ++ शहराचा दर्जा प्राप्त झाला.याबद्दल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,आयुक्त अमन मित्तल,सहाय्यक आयुक्त श्रीमती मंजुषा गुरमे, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांच्यासह माझा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न झाला.समस्त लातूरकर नागरिकांच्या वतीने आम्ही हा सन्मान स्वीकारला. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार हा सत्कार आम्ही घेऊ शकलो,अशी भावना यावेळी आपण यावेळी व्यक्त केल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.विशेष सन्मान केल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे आभारही व्यक्त केले.