नाशिक पत्रकार संघ बरखास्त

0
256

*नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाची

कार्यकारिणी बरखास्त

 :अस्थायी समिती नियुक्त* 

*अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा निर्णय*

नाशिक : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार परिषदेची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतला आहे.. जिल्हा संघाच्या संदर्भात अनेक लेखी तक्रारी पुराव्यासह आल्यानंतर परिषदेने हे कठोर पाऊल उचलले आहे.. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याबरोबरच परिषदेने जिल्हा आणि नाशिक शहरासाठी अस्थायी समिती नियुक्त केली आहे..

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी, विश्‍वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे आणि पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे यांनी आज नाशिक येथे जिल्ह्यातील पत्रकारांची भेट घेऊन नव्या रचनेबाबत चर्चा केली.. बैठकीस महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, दिव्य मराठीचे संपादक जयप्रकाश पवार, पुण्य नगरीचे निवासी संपादक किरण लोखंडे,दिव्य मराठीचे सहसंपादक अभिजित कुलकर्णी, सकाळचे वृत्तसंपादक संपत देवगिरे, आपले महानगरचे हेमंत भोसले, यांच्यासह सर्व प़मुख दैनिकाचे संपादक उपस्थित होते.. प्रारंभी परिषदेच्या पदाधिकारयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.. यावेळी बोलताना एस.एम.देशमुख यांनी नाशिक जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा केली.. त्याचबरोबर शहर व जिल्ह्यासाठी अस्थायी समिती नेमण्यात येत असल्याचे देशमुख यांनी जाहीर केले.. ही अस्थायी समिती तीन महिन्यात सदस्य नोंदणी करेल आणि त्यानंतर रितसर निवडणुका होऊन रितसर नवी कार्यकारिणी निवडण्यात येईल असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

*अस्थायी समिती :नाशिक शहर*

१) संपत देवगिरे – सकाळ – अध्यक्ष

२) आसिफ सय्यद – पुण्यनगरी

३) निलेश अमृतकर – दिव्य मराठी

४) शाम बागुल – लोकमत

५) विनोद पाटील – महाराष्ट्र टाईम्स

६) हेमंत भोसले – आपलं महानगर

७) ज्ञानेश्वर वाघ – पुढारी

.*******************

*अस्थायी समिती:नाशिक जिल्हा*

१) विश्वास (मामा) चंदात्रे – अध्यक्ष सटाणा

२) ब्रिजमोहन शुक्ला-मालेगाव

३) संदिप तिवारी– वणी-लोकसत्ता

४) नितिन गांगुर्डे – दिंडोरी

५) अमोल खरे- नांदगाव

६) राकेश गिरासे – येवला

७) राहुल दवते – निफाड

८) विजय बारगजे – घोटी

९) संदीप भोर- सिन्नर तालुका

१०) संदीप बत्तासे – हर्सुल-त्र्यंबकेश्वर

११) चंद्रशेखर शिंपी- नाशिक तालुका

१२) दिपक निकम-चांदवड तालुका

१३) अशोक गवळी – पेठ सुरगाणा

१४) रविंद्र पगार-कळवण

१५) विनोद देवरे – देवळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here