संगीतकार आनंदीविकास यांना पुण्याचा मानाचा पुरस्कार घोषित
पुणे ;(माध्यम वृत्तसेवा)-पुणे नवरात्र महोत्सवानिमित्त श्री लक्ष्मी माता लाईफटाईम अचीवमेंट हा अतिशय सन्मानचा पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमतवास दिला जातो. गेल्या 29 वर्षांपासूनची ही परंपरा पुण्यामध्ये भव्यदिव्य आयोजनाखाली साकारली जाते. या पुरस्काराचे हे 30 वे वर्ष आहे..
गेल्या 29 वर्षात हा पुरस्कार भारतरत्न भीमसेन जोशी, राम गबाले, शांता शेळके, रोहिणी भाटे, पं फेरोज दस्तूर, राजदत्त, डॉ जब्बार पटेल, उस्ताद उस्मान खा साहेब, जगदीश खेबूडकर, जयश्री गडकर, संगीत दिग्दर्शक प्यारेलाल, विठ्ठल उमाप, मधु कांबीकर, दिलीप वेंगसरकर, नितीन देसाई, मंगेश पाडगावकर, अजय -अतुल, राही भिडे, सुबोध भावे, डॉ जगन्नाथ दीक्षित, विद्याधर अनासकर, डॉ संजय मालपाणी, गणेश चंदनशिवे, प्रवीण तरडे अशा दिग्गज व्यक्तिमतवास प्राप्त झाला आहे. आता या नावामध्ये संगीतकार आनंदी विकास यांचे नाव समाविष्ट झाले आहे.
श्री लक्ष्मीमाता लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड 2024 हा गुरुवार दिनांक 03 ऑक्तोबर 2024 रोजी सायंकाळी 5-30 वा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट पुणे येथे भव्य दिव्य अशा सोहळ्यात संगीतकार आनंदी विकास यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नांदेडकरांसाठी नक्कीच ही अभिमानाची व आनंदाची बाब आहे. या आधीही आनंदी विकास यांना लोकशाही न्यूज चॅनलचा मराठवाडा रत्न पुरस्कार, कर्मयोगिनी पुरस्कार, कोल्हापूरचा सांगितरत्न पुरस्कार, स्व कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार यासह त्यांच्या नावे जमा आहेत…
आकाशावणी, सह्याद्री वाहिनी, झी मराठी, साम मराठी, पूर्वीची इ मराठी, ऑनलाईन च्या सर्वच प्लॅटफॉर्म वरून, युट्युब चॅनल वरून आनंदी विकास यांचे कार्य देश विदेशात पोहोचले आहे…