शारदीय नवरात्री निमित्त नाथ संस्थान येथे नवचंडी यागाची सांगता.
निलंगा,-( प्रतिनिधी )-श्री नाथ संस्थान औसा यांच्या वतीने श्री नाथ सभागृह औसा येथे शारदीय नवरात्री निमित्त घटस्थापना पासून दररोज चालू आसलेल्या नवचंडी यागाची आज पूर्णाहुती देऊन सांगता करण्यात आली, हे नवचंडी याग श्री नाथ संस्थानचे पाचवे पिठाधिपती सद्गुरू श्री गुरूबाबा महाराज औसेकर व श्री विठ्ठल-रूक्मीणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर वेद शास्त्र संपन्न श्री.पुरूषोत्तम जोशी गुरूजी व त्यांचे सहकारी ब्रह्मवृंद यांच्या पौरोहित्यात करण्यात आले, त्यावेळी सौ.शर्मिला गुरूबाबा महाराज, आदरणीय श्री.गोरखनाथ महाराज, सौ.निता गोरखनाथ महाराज,श्री.मच्छिंद्रनाथ महाराज, श्री.गोविंदराव माकणे,सौ.तृप्ती हेरूर, श्री.श्रीनाथ महाराज, ह.भ.प.श्री.श्रीरंग महाराज,सौ.श्रध्दा श्रीरंग महाराज, श्री.कपील माकणे, श्री.गिरीष पाटील, औसाचे माजी नगराध्यक्ष श्री.सुनिल मिटकरी, श्री.शंकरराव रकसाळे, लिंगप्पा जावळकाटे ,श्री.दिलीप तोडकरी यांच्यासह इतर भक्तगण उपस्थित होते.