20.3 C
Pune
Saturday, January 11, 2025
Homeलेख*नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणुनच हे प्रश्न मार्गी लागले...*

*नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणुनच हे प्रश्न मार्गी लागले…*

    भारतातील प्रत्येक नागरिकांचे स्वप्न साकार करणारे पंतप्रधान म्हणुन ज्यांचा उल्लेख केला जातो, नरेंद्र मोदी २०१४ नंतर पंतप्रधान झाले म्हणुनच देशातील वर्षानुवर्षापासुन रखडलेले अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागले. कदाचित पंतप्रधान ते नसते तर हे प्रश्न सुटले असते का? याची शंका वाटते. ज्यांनी सामान्य माणसाला सोबत घेवुन सबका साथ, सबका विकास या सुत्राचा अवलंब करीत  विकासाची ओळख जनतेला करून दिली. मुलभुत गरजा शिवाय सर्व वर्गसमुहातील लोकांचा समान विकास त्याहुन अधिक समृद्धशाली देश आणि शेती विकासाला प्राधान्य एवढेच नाही हिंदुत्वाचं रक्षण याशिवाय लष्कराचे आधुनिकीकरण हे सारं करताना वयाची सत्तरी पार केलेले मोदी देशातील प्रत्येक नागरिकांच्या कल्याणासाठी रात्रीचा दिवस करून चोवीस तास कठोर परिश्रम घेणारा पंतप्रधान ही त्यांची ओळख. केवळ कागदोपत्री कार्य न ठेवता कृतीद्वारे काम करताना सामान्य जनतेच्या मनावर ज्या नेतृत्वाला जागा मिळाली असं नेतृत्व केवळ आपल्या देशात नव्हे तर जगाच्या पाठीवर सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारं ठरलं. कधी कधी प्रश्न अनेकांच्या मनात येवुन जातात कदाचित मोदी हे पंतप्रधान नसते तर खरंच राम मंदिर असो किंवा ३७० कलम असो हे प्रश्न मार्गी लागले असते का? वर्तमान राजकिय व्यवस्थेत त्यांच्या नेतृत्वाचा उदय खर्‍या अर्थाने देशातील प्रत्येक नागरिकाचे भाग्य म्हणावे लागेल. मागे वळुन पहाताना आठ वर्षात त्यांनी केलेल्या कामाचा आलेख नेत्रदीपक लोकांच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे २०१४ ला टाकलेला विश्वास २०१९ मध्ये बहुमताने आणि २०२४ लोकसभा ४०० पार निश्चित यशाकडे गेल्याशिवाय रहाणार नाही. मोदी हे नेतृत्व म्हणजे वर्तमान युगातील अवतारीत पुरूष असं म्हटलं तर आश्चर्य वाटणार नाही. 

    भुतलावर साक्षात प्रभु रामचंद्राचा अवतार एका युगात होवुन गेला. पण ज्या आयोध्येत राम जन्मले इथे राम जन्मलेच नाही हा चारशे वर्षे वाद वर्तमान कलियुगात न्यायालय दरबारी पडला होता. अर्थात मताच्या राजकारणासाठी तत्कालीन व्यवस्थेने हे विषय लोंबकळत ठेवले. पण राम ही समस्त हिंदु बांधवाची आस्था आणि र्‍हदयस्थ प्राण त्यासाठी देशात हिंदु बांधवांनी मग विश्व हिंदु परिषद असेल, बजरंग दल असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल एवढेच नाही तर भाजपानेसुद्धा कितीतरी आंदोलने, संघर्ष केला. पण छे, वेगवेगळ्या राजकिय व्यवस्थेने पद्धतशीरपणे हा विषय निकाली काढला नाही. पण असं म्हणतात, जेव्हा अधर्म आणि अन्यायाची परिसीमा गाठल्या जाते तिथे सत्यरूपी माणसं जन्म घेतात तोही एक कलियुगातील अवतारच म्हणावा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशाग्र नेतृत्वामुळे राम मंदिराचा प्रश्न एकदाचा निकाली निघाला आणि आयोध्येत भव्य दिव्य मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. कदाचित उद्याच्या संक्रातीपर्यंत रामलल्ला मुर्ती प्रतिष्ठापना जन्मस्थळावर होईल. पण चारशे वर्षानंतर मोदीच्या नेतृत्वामुळे हे सारं झालं. हे सत्य कुणी नाकारू शकत नाही. 

    असाच एक प्रश्न जो भारतातील प्रत्येक नागरिकांच्या अस्मितेचा आणि राष्ट्रभक्तीचा विषय बनला होता. खरं म्हणजे आपल्या देशाची फाळणी असेल ती कुणामुळे झाली? जबाबदार कोण होतं? त्या काळात केवळ मताचं लांगुनचालन करण्यासाठी ज्या गोष्टी एखाद्या वर्गसमुहाच्या नेत्याने मागितल्या त्या सर्व आपल्याच देशातील तत्कालीन नेत्यांनी देवुन टाकल्या. काश्मिरमध्ये ३७० कलम मुळात लावण्याची गरज नव्हती. त्याला काँग्रेस हाच जबाबदार असं म्हणायला हरकत नाही. पण हे कलम उखडुन काढण्यासाठी ७५ वर्षे भाजप तथा हिंदु बांधवांना लढा द्यावा लागला. डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांचं बलिदान असेल किंवा भाजपाच्या अनेक थोर महापुरूषांनी दिलेला लढा असेल पण ३७० रद्द केल्या गेलं नाही. त्यासाठी नरेंद्र मोदी हे नेतृत्व जन्माला येवु द्यावं लागलं. ज्यांनी संसदेत बहुमताने हे कलम रद्द केलं. 

नागरिकता संशोधन कायदा असेल त्या अंतर्गत वर्षानुवर्षे भारतात राहणार्‍या लोकांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे असेल, काश्मिरमधील कलम रद्द केल्यानंतर स्वातंत्र्याच्या नंदनवनात जगायला संधी लोकांना मिळाली. नरेंद्र मोदी यांनी एका एका प्रश्नावर लक्ष घालताना देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं. शत्रु राष्ट्र त्याची जागा त्यांना दाखवुन दिली. आमच्या अंगणात याल तर याद राखा, आम्ही चांगले पण आहोत पण त्याहुन अधिक आमच्या हिताला जेव्हा बाधा येईल तेव्हा आम्ही सुतभर मागे हटणार नाहीत. भारतीय सेनेचं आधुनिकीकरण त्यांनी करून दाखवलं. नवनविन तंत्रज्ञानाचे शस्त्र जे कधीच व्यवस्थेने खरेदी केलेले नव्हते. लडाख, अरूणाचल सीमावर्ती भागामध्ये रस्त्याचे जाळे निर्माण केलं. ३६ राफेल खरेदी विमानाची केली. एवढेच नाही तर करोडो रूपायाची आर्थिक तरतुद सुरक्षेच्या प्रश्नावर दरवर्षी ते बजेटमध्ये करतात. विक्रांतसारख्या जलावतरण रखडलं होतं ते त्यांनी करून दाखवलं. आपल्या सैनिकाच्या मनाचं धैर्य वाढवावं, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी पगार वाढ असेल, वेळेवर पेंशन असेल, रखडलेली त्यांची कामे असतील एवढेच नाही तर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह अधुनमधुन सीमावर्ती भागाचा दौरा करतात. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकिस्तानचा दौरा करून आम्ही मैत्रीही कशी करतो हा आदर्श दाखवुन दिला. वास्तविक पहाता विरोधकांनी टिका केली पण योग्य भुमिकेला जिथे राष्ट्रहिताची जोपासना होते तिथे हे नेतृत्व कधीच मागे हटलेले नाही. 

शेतकर्‍यांच्यासाठी किसान सन्मान योजना आणली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशी योजना राबवल्या गेली. आपल्या संसदेचे अद्ययावत संसद भवन असावं ज्याची उभारणी सद्या सुरू आहे. सर्वात चांगली गोष्ट मोदी सरकारने केली ती म्हणजे तीन तलाक कायदा झालाच नसता. करोनासारख्या संकटात मानवी जीवाची हानी होवु नये म्हणुन स्वत: पंतप्रधान मोदीजींनी हा विषय अत्यंत काळजीपुर्वक हाताळुन तब्बल दोन वर्षात देशात अत्याधुनिक आरोग्य सेवा उभारली. या व्यतिरिक्त दुसरं नेतृत्व असतं तर आज याच देशातील लोकसंख्या अर्ध्यावर आली असती कारण संकट तेवढं भयानक होतं. करोना लसीचं उत्पादन आपल्याच देशात तयार करून आत्मनिर्भर हा प्रयोग यशस्वी केला. कमी कालावधीत २०० कोटीपेक्षा अधिक लसीचे डोस मोफत दिले. चिनाब ब्रिज, बुगी ब्रिज कदाचित झाला नसता. नॅशनल पोलीस मेमोरिअल झाले. अटल टनल हा बोगदा पुर्ण केला. सोलार ऊर्जेत आपला देश पुढे आहे. वंदे मातरम सारखी ट्रेन देशात सुरू केली. यमुना एक्सप्रेस वे व दिल्लीला रिंग रोड हे फार मोठे यश म्हणावे लागेल. विशेष म्हणजे ईडी आणि सीबीआय या केंद्र सरकारच्या गुप्तचर संस्था इतक्या कार्यक्षम असतात हा अनुभव केवळ मोदी यांच्या नेतृत्वात देशवासियांना आला. ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला. काळा पैसा बाळगणारे उघडे पडले. नवोदय विद्यालयाला तमसो मा ज्योतिर्गमय हा टॅग मिळाला. एक महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन ज्याची सुरूवात भारताने केली. अनेक प्रसंगी पाकिस्तानला पराभुत करून जगापासुन वेगळं पाडण्यात आलं. 

वन रँक वन पेंशन, रेल्वेचे आधुनिकीकरण कदाचित या वेगाने झाले नसते. एअरपोर्टसारखी रेल्वे स्टेशन या काळात झाली. एक निशान, एक प्रधान, एक संविधान हे काश्मिरमध्ये आज पहायला मिळतं. हिंदु धर्मात जनजागरण मोठ्या प्रमाणावर उत्सव हे केवळ मोदी यांच्या नेतृत्वामुळेच. मेक इन इंडिया हा प्रयोग त्यांनी चालु केला. आत्मनिर्भर सारखी कल्पना अंमलात आली नसती. स्टार्ट अप भारत एवढेच नाही एन ९५ मास्क आणि पीपी किट याचा निर्यात म्हणुन देश पुढे आला. करोनासारख्या संकटात ऑक्सीजन एक्सप्रेस विमानानेसुद्धा पुरवठा झाला. युक्रेनमध्ये आडकलेली ३०,००० भारतीय मुलं सुखरूप परत आणली, जनधन योजना, उज्वला गॅस, खेड्यापाड्यांना वीज, मोफत शौचालय, बुलेट ट्रेन, ज्ञानव्यापी मथुरा प्रकरण यातही विशेष लक्ष घातले. खासदार-आमदारांच्या गाडीवरचे लाल दिवे बंद झाले. खादीचा आग्रह त्यामुळे उद्योगाला संजीवनी मिळाली. काशी विश्वनाथ कॉरीडॉर झाला. नमामी गंगे गंगा सफाई, सागरमाला प्रोजेक्ट, आणि सहकार मंत्रालय केंद्राने स्थापन केलं. मोदीजींनी आवाहन केल्यानंतर गॅस सबसिडी लोकांनी सोडली. योग्य ते लोकांना पद्म आणि पद्मविभुषण पुरस्कार देण्याची सुरूवात झाली. खेळाडूंना प्रोत्साहन, आर्थिक सहकार्य एवढेच नाही तर त्यांच्याशी संवाद हे मोदींनी चालु केले. 

अशा असंख्य योजना ज्याचा संबंध देश हित, जनकल्याण आणि अंत्योदय अर्थात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी दाखवुन दिलेल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षात या सर्व पार्श्वभुमीवर केलेलं काम ज्यामुळे जनतेचा विश्वास या नेतृत्वावर प्रचंड वाढला. अबकी बार, चारसो पार हे आता विरोधकांनी पण ओळखलं. म्हणुन देशातील सर्वसामान्य माणसांना एकच नेतृत्व नरेंद्र मोदी याशिवाय दुसरा विषय दिसत नाही.                       

    प्रा.डॉ.राम बुधवंत 

                                 

   भाजप प्रदेश प्रवक्ता, पॅनेलिस्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]