खासदार म्हणून या भागात कोणती विकासकामे केलीत – आ. अभिमन्यू पवार
अर्चनाताई पाटील यांचे औसा विधानसभा मतदारसंघात जंगी स्वागत…!
मतदारसंघातील गावांना भेटी, मतदारांशी साधला संवाद..
विकासात धाराशिव मतदारसंघ मागे राहू नये – अर्चनाताई पाटील
औसा – ( वृत्तसेवा )-खासदार झाल्यानंतर या भागात एकदाही न फिरकलेल्या खासदारांनी या भागात कोणती विकासकामे केली याचे उत्तर अगोदर जनतेला द्यावे या भागाच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर परत गेला तेव्हा खासदार ओमराजे निंबाळकर काय करीत होते.या पाच वर्षांत केवळ विकासात खीळ घालण्याचे काम खासदारांनी केले असून नको त्या गोष्टीचा बाऊ करणाऱ्या खासदारांनी अगोदर विकासावर बोलावे असा सवाल आमदार अभिमन्यू पवार यांनी विचारला आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या (दि.७) रोजीच्या औसा मतदारसंघातील जनाशीर्वाद दौऱ्याचा शुभारंभानिमित्त ते बोलत होते.रविवारी लामजना पाटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी औसा मतदारसंघातील जनाशीर्वाद दौऱ्याचा शुभारंभ केला.
याप्रसंगी तांबाळा, कासार बालकुंदा, कासारसिरसी, हासोरी, हरिजवळगा, मदनसुरी, भुतमुंगळी, सरवडी, एकोजी मुदगड, नदी हत्तरगा आदी गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधत आमदार अभिमन्यू पवार व महायुती च्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी महायुती ची भूमिका स्पष्ट करीत आम्ही मोदी सरकारने केलेल्या विकास कामांवर मत मागायला आलो असल्याचे सांगितले.यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी पक्षश्रेष्ठींनी अर्चनाताई पाटील यांच्या माध्यमातून एक मजबूत उमेदवार दिला असल्याचे सांगून महिला संघटनात्मक बांधणींचा अनुभव व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून केलेले प्रभावी काम निश्चितच येणाऱ्या काळात खासदार म्हणून या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे औसा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासकामे झपाटय़ाने होत असताना आपल्या भागाच्या विकासासाठी खासदार म्हणून अर्चनाताई पाटील यांना मत देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना महायुती च्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत असताना आपला धाराशिव मतदारसंघ मागे राहू नये यासाठी मतदारांनी मला साथ द्यावी मला मतदान म्हणजे मोदींजीना मतदान असेल असे सांगून निश्चितच येणाऱ्या काळात महत्त्वपूर्ण विषयांसह महिलांच्या विषयांसंदर्भात अधिक प्रभावीपणे काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मोठय़ा संख्येने मतदार बंधू भगिनीं व महायुती चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.