28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसांस्कृतिक*धर्माचे रक्षण करील त्यांचे धर्म रक्षण करतो*

*धर्माचे रक्षण करील त्यांचे धर्म रक्षण करतो*

भागवत कथेत सहाव्या दिवशी प.पू. विद्यानंदजी सागर महाराज यांचे आशीवर्चन

लातूर , दि.३० ( प्रतिनिधी )- माणसाच्या जीवनामध्ये धर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे धर्म हाच माणसाच्या जीवनाचा मूळ आधार आहे धर्माच्या नियमानुसार चालणे हे प्रत्येक मानव जातीचे आद्य कर्तव्य असून धर्मामुळेच आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो जो धर्माचे रक्षण करील त्यांचे धर्म नक्कीच रक्षण करतो असे प्रतिपादन प.पू. विद्यानंदजी सागर महाराज यांनी केले .


लातूर येथील श्री राधाकृष्ण सत्संग समिती द्वारा आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञामध्ये पूज्य विद्यानंद सागर महाराज बोलत होते. आपल्या अमृतवाणीतून धर्मसभेला संबोधित करताना पूज्य विद्यानंद सागर महाराज पुढे म्हणाले की धर्म हा टोपलीमध्ये बंद करून ठेवतात येत नाही परमात्मा आपल्या जवळ येतो परंतु संसारामुळे आपण त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो दानधर्म अत्यंत महत्त्वाचे आहे .परंतु दानधर्म करण्यासाठी समर्पणाची भावना लागते . गळ्यात माळ आणि कपाळावर गंध लावण्यासाठी सुद्धा आज लोकांना लाज वाटते. परमपिता परमेश्वराच्या सानिध्याने प्रत्येकाच्या जीवनाला आनंद मिळतो.   श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या माध्यमातून जोडला गेलेला भक्तगण हा मला परिवारासारखा आहे या माझ्या परिवारासोबत संवाद करताना मला कोणत्याही वेदना होत नाहीत म्हणून सत्य हा सर्व कल्याणाचा दाता नारायण आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले .श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ हा सात दिवस चालतो कथा ऐकल्यानंतर मला कोणतीही अपेक्षा नाही. परंतु भक्तांनी परमेश्वराकडे प्रार्थना करून मी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वार्थाला बळी पडू नये म्हणून देवाकडे प्रार्थना करण्याची दक्षिणा भक्तगणांनी द्यावी अशी अपेक्षा विद्यानंद सागर महाराज यांनी केली. आजच्या काळामध्ये धर्म हा पाखंडी लोकांमुळे भ्रष्ट होत आहे .परंतु या पाखंडीपणाला बाजूला सारून धर्माचे रक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे .भगवान श्रीकृष्णाचा सांभाळ करीत असताना यशोदा माता कृष्णाचा अवघडपणा सहन होत नसल्यामुळे पाठलाग करीत होती परंतु त्यावेळी तिला अहंकार आला . प्रसंग कसाही असो परंतु आपल्या मनात अहंकार येता कामा नये पुढे बोलताना विद्यानंद सागर महाराज म्हणाले की  , कोणत्याही परिस्थितीमध्ये विवस्त्र होऊन स्नान करणे हा जलदेवतेचा अपमान आहे .

द्वापार युगामध्ये शाप मुक्त होऊन कृष्ण परमात्म्याला दोघेजण शरण आले आणि  विवस्त्र अवस्थेमध्ये स्नान करणाऱ्या दोघांची शापातून मुक्तता झाल्याचे आपण पाहतो. भगवान श्रीकृष्ण पाच वर्षाचे असताना त्यांना घेऊन गोकुळातून वृंदावनाकडे निघाले वृंदावन म्हणजे भक्ती अखंड भक्ती आणि शक्तीचे जिते जागते उदाहरण आहे ,हे पूजनीय बाबा सांगत असताना उपस्थित महिला पुरुष भक्तगण श्रोते नाच गाण्यामध्ये दंग झाले होते. वृंदावन सारखी नवीन वस्ती निर्माण केली म्हणजे शून्यातून विश्व निर्मिती सारखे हे वसती स्थान आहे .जीवनाचा आदी आणि अनंत हा परमेश्वरच आहे म्हणून बालमित्रांसोबत गाई गुरांना घेऊन श्रीकृष्ण विविध लीला करीत होते .यावेळी इंद्र देवाची पूजा करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने विरोध केला आणि त्या ऐवजी आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे आरिष्ट होणार नाही म्हणून माझ्या स्वप्नात आलेल्या गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास सर्वांना भगवान श्रीकृष्णाने सांगितले. 5000 वर्षांपूर्वी पावसासाठी वृक्ष लागवडीचा संदेश भगवान श्रीकृष्णाने दिला . गोवर्धन पर्वतास अभिषेक करण्यासाठी साक्षात गंगा भगवान श्रीकृष्णाने आणली  .गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी आपल्या सर्व सवंगड्यासह गोवर्धन पर्वताची पूजा भगवान श्रीकृष्णाने केली आणि इंद्राला तुझ्या ऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करणाऱ्या श्रीकृष्णाला शिक्षा करावी असे काही जणांनी सांगितल्यानंतर इंद्राने आपला कोप दाखवत बारा मेघांना आदेश दिला आणि त्यावेळी प्रचंड वादळ विजांचा कडकडाट ढगांचा गडगडात होऊन मोठा पाऊस सुरू झाला. अशा अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीने उचलून सर्व प्राणिमात्रांना गोवर्धन पर्वताखाली आश्रय दिला म्हणून भगवान श्रीकृष्णाचे महत्त्व कोणालाही विसरता येणार नाही . 

परमात्मा फक्त भक्ती आणि प्रेमाचा भुकेला आहे . नारी रतन की खान है नारी की निंदा कभी न करो असाही संदेश त्यांनी दिला  कारण नारी म्हणजे पवित्र आत्मा असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले. यमुना नदीच्या तीरावर अनेक गाई वासरे महिला पुरुषासह आपल्या मधून बासरीने मनमोहीत करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने नदीत स्नान करणाऱ्या तरुणींचे कपडे घेऊन झाडावर बसले .स्त्री आणि पुरुष एकच आहेत हा संदेश देत असताना चीर हरण या प्रसंगातून पाण्यातून प्रार्थना करणाऱ्या शेकडो गोपिकांचा देरे कान्हा चोळी अन लुगडी या गीताच्या तालावर उपस्थित भक्तगणांनी रोमहर्षक नृत्य आविष्कार सादर केला .तर अनेक हजारो महिलांनी नृत्य अविष्कारामध्ये आपला आनंद व्यक्त केला . 

यावेळी पूज्य विद्यानंद सागर महाराज म्हणाले की कपडे म्हणजे सूक्ष्म वासनेचे प्रतीक आहे .त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने शरद पौर्णिमेच्या रात्री आपल्या हजारो गोपींना रासक्रीडेसाठी पाचारण केले आणि प्रत्येक महिलांना भगवान श्रीकृष्णाच्या सोबत रासलीला करण्याचा भास झाल्याने या प्रसंगातून स्त्री आणि पुरुष हे वेगळे आहेत हा भाव नष्ट करण्याचा संदेश परमात्म्याला द्यायचा होता . लातूर येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील भव्य दिव्य सभा मंडपामध्ये हजारो महिला पुरुष भक्तगण श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञासाठी उपस्थित होते श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या भागवत कथा ज्ञान यज्ञाचे लातूर परिसरातील सर्वत्र कौतुक होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]