निलंगा,-( प्रशांत साळुंके )-
मराठवाड्याची कुस्ती पंढरी म्हणून ओळखले जाणारे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे रामलिंग मुदगड हे गाव कुस्ती क्षेत्रात एक काळ विश्वाला गवसणी घातलेले आहे.
पैलवान रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचे हे जन्म भुमी व कर्मभूमी मानले जाते.
या गावाचे अनेक मल्ल राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत.प्रतीवर्षी रामनवमी निमित्त गावचे कुस्ती मैदान घेतले जात होते.पण मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गावच्या यात्रेनिमित्त भरवण्यात येणारे कुस्ती मैदान थांबले होते.कुस्ती क्षेत्रावर भीषण संकट उभे राहिले होते.पण यावर्षी कोरोना चे सर्व नियम शिथिल झाल्याने कुस्ती क्षेत्राला नव उभारी देण्यासाठी, कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गावातील नामांकित आजी-माजी पैलवानांनी कंबर कसली आहे.सोमवार दि.११ एप्रिल ०२२ रोजी सायंकाळी ४:०० वा. भव्य जंगी कुस्ती मैदानाचे नियोजन सुरु असुन याची मोर्चेबांधणी ही शेवटच्या टप्प्यात असल्याचे समजते.
लातूरसह,कोल्हापूर, पुणे,सोलापूर,बीड,उस्मानाबाद, सांगली, सातारा ई. ठिकाणाहून पैलवान मंडळी येणार असल्याचे सांगीतले गेले आहे.आनेक जुनेजाणकार कुस्तीतील नामांकित पैलवान,वस्ताद हमखास पणे या कुस्ती मैदानास हजेरी लावणार असुन त्यांचा देखील मैदानात यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.त्याकरीता मैदानाच्या शिस्तबद्ध नियोजनासाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.ज्ञानेश्वर गोचडे,मुंबई कामगार केसरी पै.जिवन बिराजदार, कुस्ती निवेदक पै.महादेव मेहकरे, पै.प्रभाकर पाटील, पै.लहु गोरे,पै.रामलिंग नारंगवाडे, पै.सचिन मुळे,पै.शेशिकांत कांबळे,पै.बालाजी पेद्दे,पै.सहदेव मंगे,यांचेसह गावकरी मंडळी कामाला लागली आहे.मैदानातील प्रेक्षणीय लढती पाहण्यासाठी पंचक्रोशीसह जिल्हाभरातील कुस्तीप्रेमीना मोठ्याप्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.