औसा: शिक्षक निस्वार्थी भावनेने विद्यार्थांना शिकवतो, त्याची जाण ठेवून ईतक्या वर्षांनी आमची आठवण करून आमचा सत्कार केलात, अश्या विद्यार्थांचा आम्हाला अभिमान आहे, असे मत विवेकानंद विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक महादेव जंगाले यांनी व्यक्त केले.
औसा येथील विवेकानंद विद्यालय येथे इ.स.१९९९ ते २००० झाली दहावीत शिकलेले विद्यार्थी आज वेगवेगळ्या जिल्ह्यात, राज्यात वास्तव्यास आहेत, ते सोशल मिडीया ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले आणि आपण शिकलेल्या शाळेला भेट दिली व स्नेह संमेलनाचा कार्यक्रमात आयोजित करून विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक महादेव जंगाले, वैजनाथ उस्तुरे सर, गायकवाड सर, भोसले सर, खोजे सर, मोरे माॅडम, सोनवळकर माॅडम यांचा सत्कार केला.
त्याप्रसंगी जंगाले सर म्हणाले त्याकाळात विद्यार्थांशी कठोर वागून, प्रमाणिकपणे चांगला रस्त्या दाखवण्याचा पर्यंत केला कदाचित त्यावेळी आमचा आपल्याला शिक्षा केल्याचा रागही येत आसेल, पण आज आपल्या शाळेचे विद्यार्थी येवढ्या मोठ्या पदावर गेलेलं पाहुण अभिमान वाटतो, खर तर आमच्या आशिर्वादा पेक्षा आपल्यासारख्या गुणी विद्यार्थांच्या आशिर्वादाने आमचे कल्याण झालयं, असे बोलून जंगाले सर म्हणाले आज ऐवढ्या वर्षांनी आमची आठवत केलात, प्रेम व्यक्त केल्यात, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे.
तसेच त्यावेळी सत्काराला प्रत्युत्तर देताना ह.भ.प.वैजनाथ उस्तूरे सर म्हणाले पैसेवाला एखादा पुजनिय असु शकतो पण विदवान हा जगात पुजनिय असतो, आम्ही दिलेल्या ज्ञानाचा आपण फायदा करून आज कोणी डाॅक्टर, इंजिनिअर, वकील,सरकारी अधिकारी, पत्रकार, राजकारणी होवून अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं व शाळेच नावं मोठ केलं याचा आम्हा सर्व शिक्षकांना अभिमान वाटतो.
या स्नेह संमेलनात डाॅ.मुकुंद फुटाणे, नगरसेवक गोपाळ धानुरे, नितीन नाईक,जगदीश परदेशी,ॲड.अनुजा तावशीकर-नाईक , प्रियंका दडपे-नाईक ,सरिता व्यवहारे – पाठक, उषा काळे – ढाले,विजय कोचेट्टा, प्रकाश कुलकर्णी, प्रशांत तेलंग, दिगंबर सुतार, प्रशांत मुळे, संपत माने, लक्ष्मीकांत बलसुरे, योगेश सोमवंशी, उषा ढाले, सरिता पाठक, बालाजी फरकांडे, नरेश क्षिरसागर, लक्ष्मीकांत बलसुरे, डाॅ. योगेश सोमवंशी ,दत्ता ससाणे, डिगंबर सुतार, जयचंद इगवे, महादेव कटके, संतोष भिसे, जगदीश जाधव, संपत माने, प्रशांत मुळे उपस्थित होते.
या स्नेह संमेलनाची सांगता कोरोना काळात मृत्यु पावलेल्या शिक्षकांना श्रध्दांजली वाहुन करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ धानुरे व आभार प्रदर्शन जगदीश परदेशी यांनी केले आणि सर्वांनी स्नेह भोजन करत आपल्या जुन्या आठवणीला उजाळा दिला.