देशहितासाठी शृंगारेंना मताधिक्य देऊन
विकासपुरुष नरेंद्र मोदीजींना साथ द्यावी
भाजपाच्या लातूर ग्रामीण मेळाव्यात बहुजन विकास कल्याणमंत्री अतुल सावे यांचे आवाहन
लातूर दि.२८ ( वृत्तसेवा) – गेल्या नऊ – दहा वर्षात देशाने विकास कामात मोठी उंची गाठली असून अनेक ऐतिहासिक निर्णयाबरोबरच देशभरातील सर्वसामान्य जनतेचा विचार करून विविध योजना सुरू करणारे आणि दलाल विरहित गरजूंना विविध योजनेचा थेट लाभ देणारे विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देशहिताकरिता साथ देण्यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन राज्याचे इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे यांनी केले.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथील भक्ती शक्ती मंगल कार्यालयात गुरुवारी दुपारी झाला. या मेळाव्यास बहुजन कल्याण विकासमंत्री अतुल सावे, भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, खा. सुधाकर शृंगारे, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, ज्येष्ठ नेते माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, बब्रुवान खंदाडे, लातूर जिल्हा प्रभारी प्रा. किरण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, लोकसभा निवडणूक संयोजक राहुल केंद्रे, सहसंयोजक भारत चामे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव भागवत सोट, जिल्हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले, तुकाराम गोरे, ललिता कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तराताई कलबुर्गे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, अॅड संभाजी पाटील त्र्यंबकआबा गुट्टे, बापूराव राठोड, सतीश आंबेकर, अॅड. दशरथ सरवदे, बन्सी भिसे, अभिषेक आकनगीरे, लालासाहेब देशमुख, सुभाष जाधव, वसंतराव दिघोळे, सुधीर पोतदार यांच्यासह अनेकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाचा आणि कुटुंबातील प्रत्येक माणसाचा विचार करून नरेंद्रजी मोदी यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि जात पात धर्म न पाहता प्रत्येक गरजवंतापर्यंत थेट दिल्या आयोध्या येथे राम मंदिर होईल की नाही अशी शंका अनेकांच्या मनात होती मात्र भव्य दिव्य मंदिराची उभारणी नरेंद्रजी मोदींनी केल्याने २२ जानेवारीला घरा घरात दिवाळी साजरी करण्यात आली असल्याचे बोलून दाखविले. नरेंद्रजी मोदी पुन्हा या देशाचे पंतप्रधान होणार यात कसलीही शंका नाही तेव्हा मोदीजींना साथ देण्यासाठी खा. सुधाकर शृंगारे यांना बहुमताने विजयी करावे प्रत्येक कार्यकर्त्यांनी मताधिक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असेही आव्हान केले.

मेळाव्यात बोलताना उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांनी पक्षश्रेष्ठीने परत उमेदवारी देऊन काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या विविध विकास कामाचा आढावा सांगितला. लातूर लोकसभा मतदार संघात ३ हजार कोटी रुपयाचे विकास कामे केली असल्याचे सांगितले. रेल्वेच्या कारखान्या पासुन ते पीट लाईनच्या कामाची माहिती दिली. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि देशवासीयांच्या हितासाठी नरेंद्र मोदीना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला विजयी करावे असे आवाहन खा. शृंगारे यांनी केले.

यावेळी बोलताना भाजप नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामाचा आढावा घेउन त्यांचे नेतृत्व जगाने स्वीकारले असल्याचे बोलून दाखवले. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदीना पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येकांनी स्वतःला उमेदवार समजुन विजयासाठी काम करण्याचे आवाहन केले.
अत्यंत आक्रमकपणे विरोधकांच्या प्रचाराला उत्तर देताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, विरोधकांनी स्थानिक उमेदवार असा प्रचार सुरु केला आहे सुधाकर शृंगारे हे काय उपरा आहे का? शृंगारे हे चाकुर तालुक्यातील रहिवासी आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी मत मागणाऱ्या काँग्रेस पुढार्यांनी कुटुंबाचा आणि परिवाराचाच विकास केला सामान्य जनता आजपर्यंत दिसली नाही का असा प्रश्न उपस्थित केला.

देशभर उद्योग व्यवसाय करणारा कर्तत्ववान सुधाकर शृंगारे साधा भोळा माणुस आहे. गेल्या पाच वर्षात रामनवमी, शिवजयंती, आंबेडकर जयंती व इतर उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी अत्यंत अभिनव पध्दतीने जोरदार साजरे केले. त्यांच्या घरातुन कोणीही रिकाम्या हाताने परत आलेला नाही. सर्वांना सोबत घेउन चालण्याचे धोरण ठेवल आहे. विरोधकांचा उमेदवार हा खरा मागसवर्गीय आहे का? असा खडा सवाल करीत शिवराज पाटील चाकुरकर यांचा पराभव कोणी केला हे आता विचारले पाहिजे. असे सांगून आ. रमेशअप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना किमान ५० ते ६० हजाराचे मताधिक्य कशा पद्धतीने मिळेल यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे असे आवाहन केले.

या मेळाव्यात गोविंदांना केंद्रे, गणेशदादा हाके, दिलीपराव देशमुख, बब्रुवान खंदाडे, शिवाजीराव पाटील कव्हेकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेची माहिती दिली मोदीजींना साथ देण्यासाठी सुधाकर शृंगारे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. मेळाव्याचे प्रास्ताविक दशरथ सरवदे यांनी केले. सुत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी तर शेवटी राजकिरण साठे यांनी उपस्थित यांचे आभार मानले.
या मेळाव्यास जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, सुपर वॉरियर्स, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.