देवेंद्र भुजबळ यांना उत्कृष्ट संपादक पुरस्कार
मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव
मुंबई (वृत्तसेवा )-प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समितीतर्फे श्री देवेंद्र भुजबळ यांना उत्कृष्ट संपादक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मुंबई येथील नॅशनल कॉलेज च्या सभागृहात येत्या रविवारी राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ जी डी यादव यांच्या हस्ते,नासा चे शास्त्रज्ञ डॉ डेरिक एंजलस् , वर्ल्ड व्हिजन ,मुंबईचे संस्थापक अध्यक्ष प्रा नागेश हुलावले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
देवेंद्र भुजबळ यांचा अल्प परिचय
देवेंद्र भुजबळ यांनी आर्थिक दृष्ट्या आकर्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडले. पत्रकार, दूरदर्शन निर्माता, माहिती खात्यात जिल्हा माहिती अधिकारी , उपसंचालक व संचालक
म्हणून आणि आता
न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे (www. newsstorytoday.com)
संपादक असे मिळून गेली ४० वर्षे ते प्रसार माध्यमात सक्रिय आहेत.
दूरदर्शनच्या गाजलेल्या “महाचर्चा” कार्यक्रमाचे ते ४ वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सन तर आकाशवाणी वरील
महाराष्ट्र शासनाच्या “दिलखुलास” कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागांचे ते टीमलीडर होते.
महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज वेबपोर्टलसाठी ‘करिअरनामा’ हे सदर त्यांनी सुरू केले . या सदरासाठी ते स्वतः नियमित लेखन करीत असत. त्यांचे हे लेख विविध वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध होत.
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात त्यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले.
मलेशियातील चौथ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते.या बरोबरच त्यांची विविध ठिकाणी संवाद सत्रे झाली आहेत, होत असतात. विविध विषयांवर ते सातत्याने लिहीत असतात.
श्री भुजबळ गेल्या वर्षी अमेरिकेत असताना शिकागो मराठी मंडळाने त्यांचे सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता ” हा त्यांचा संशोधन पर लेख मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी, गुजराती, ऊर्दू भाषेतही प्रसिद्ध झाला आहे .
साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक नाट्य, चित्रपट , दूरदर्शन, प्रसार माध्यमे यात कार्यरत राहण्यासाठी देवेंद्र भुजबळ सतत प्रयत्नशील असतात.
समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठीही ते काम करत असतात.
देवेंद्र भुजबळ हे पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रा एल एन गोखले पाठ्यवृत्तीचे सर्व प्रथम मानकरी ठरले आहेत.तर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या मास्टर्स पदवीत ते प्रथम श्रेणीत सर्व प्रथम आले आहेत.फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, यशदा या संस्थांचे माध्यम अभ्यासक्रम ही त्यांनी पूर्ण केले आहेत.
देवेंद्र भुजबळ यांची आता पर्यंत पुढील पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
१) भावलेली व्यक्तिमत्वे
(विविध व्यक्तींचे जीवन कार्य)
२)गगनभरारी
( महिलांच्या यश कथा)
३)प्रेरणेचे प्रवासी
( पुरुषांच्या यश कथा)
४) स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता
५)करिअरच्या नव्या दिशा
( ७०० सरकारी कोर्सेस ची माहिती) दुसरी आवृत्ती प्रसिद्ध
६) अभिमानाची लेणी
(ई बुक)
( थोर व्यक्तींचे जीवन कार्य,विचार)
७) समाजभूषण
(विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या यश कथा )
८) “आम्ही अधिकारी झालो “
( विविध अधिकाऱ्यांच्या यश कथा).दुसरी आवृत्ती प्रसिद्ध
शासकीय सेवेत असताना, शासनाच्या विविध प्रकाशनांचे संपादना व्यतिरिक्त निवृत्ती पश्चात पुढील पुस्तकांचे संपादन केले आहे.
१) “जीवनप्रवास”
लेखिका: सौ वर्षा महेंद्र भाबळ
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन
२) “समाजभूषण २”
लेखिका:सौ रश्मी हेडे
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन
३) “मी,पोलीस अधिकारी”
लेखिका: निवृत्त डीवायएसपी सुनिता नाशिककर
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन
४) “पौर्णिमानंद”
काव्य संग्रह
सौ पौर्णिमा शेंडे
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन .
५) “अजिंक्यवीर “आत्मचरित्र. लेखक:श्री राजाराम जाधव
निवृत्त सह सचिव ,
महाराष्ट्र शासन
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन .
६) अंधारयात्रीचे स्वप्न
वडिलांचे चरित्र.
लेखक: श्री राजाराम जाधव
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन .
७)”चंद्रकला” कादंबरी.
लेखक:श्री राजाराम जाधव
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन .
८)”हुंदके सामाजिक वेदनेचे”
लेख संग्रह.
लेखक:श्री राजाराम जाधव
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन .
९) “मी शिल्पा…
चंद्रपूर ते केमॅन आयलंडस.
लेखिका: शिल्पा तगलपल्लेवार गंपावर
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन
आगामी प्रकाशने
१) सत्तरीतील सेल्फी
लेखक: चंद्रकांत बर्वे
निवृत्त दूरदर्शन संचालक,मुंबई
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन
२) नर्मदा परिक्रमा
लेखिका: मानसी चेऊलकर अलीबाग
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन
३) ओठांवरील गाणी
लेखक:विकास भावे,ठाणे
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन
४) मी वाचलेली पुस्तके
लेखक:सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक, नाशिक
५)कॉमा
लेखिका:सौ अलका भुजबळ
नवी मुंबई
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन
६) माध्यमातील माणसं
लेखक:देवेंद्र भुजबळ
निवृत्त माहिती संचालक
नवी मुंबई
खुप छान गोपाळ कुलकर्णी जी. आभारी आहोत.