येत्या २९ तारखेच्या मुंबईतील लिंगायत महामोर्चाचे स्वागतच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इचलकरंजी ( प्रतिनिधी )-
आपल्या निरनिराळ्या मागण्यांसाठी मुंबई येथे येत्या २९ तारखेला लिंगायत समाजाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे राज्य सरकार स्वागतच करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेबरोबर दिनांक 29 जानेवारीच्या लिंगायत महामोर्चा संदर्भात मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
यावेळी माजी मंत्री आमदार विजय देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक ॲड.अविनाश भोसीकर, राज्य समन्वयक ॲड. माधवराव पाटील टाकळीकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बी. एस. पाटील,(हेरवाडकर) विजयकुमार हत्तुरे, सुधीर सिंहासने, प्रा. राजेश विभूते, महेश पाटील, प्रदीप बुरांडे, वीरेंद्र मंगलगे, दया किडे, योगेश कापसे आदीसह शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाशी बोलताना नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी 29 जानेवारीच्या मोर्चाचे राज्य सरकार स्वागत करेलच, त्याचबरोबर सर्व मागण्या संदर्भात देखिल विचार करून प्रामुख्याने सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. मोर्चावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः, उपस्थित राहून निवेदन स्विकारण्याची ग्वाही देखिल दिली.
फोटो– लिंगायत समाजाच्या मोर्चासंदर्भात समाजातील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांकडून निवेदन स्विकारताना