प्रिय उद्धवजी,
सप्रेम नमस्कार
बाळासाहेब यांचा शिवसैनिक आज मुख्यमंत्री झाला आहे आपणास आम्ही शपथविधीला निमंत्रण दिले होते आपण आला नाही असो.
आपण ठरवून संधीचा फायदा घेऊन बाळासाहेब यांना दिलेला शब्द स्वतः पक्षप्रमुख म्हणून अमलात आणला होता आपण त्यासाठी जो मार्ग निवडला तो बाळासाहेब यांच्या विचारधारेशी यत्किंचतही जुळत नव्हता असो
आपल्या अश्या कृतीमुळे शिवसैनिक दुखावला होता त्याचा स्फोट राज्यसभा सदस्य व विधानरिषदेतील सदस्य निडणुकांपूर्वी उदयास आला नंतर काय झाले आपण पाहात आहे असो
मला सहज मुख्यमंत्री होता येत होते पण मी आपण बाळासाहेब यांना दिलेला शब्द स्वतः पाळला आहे
मला सत्तेचा हव्यास आहे असे प्रतिपादन माध्यमातून करत आला त्याला मी कृतीतून उत्तर दिले आहे
तत्वनिष्ठ राजकारण टिकाऊ असते हेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे
माझी देहबोली संतुष्ट वाटत नव्हती असे निरीक्षण शरद पवार यांनी नोंदविले आहे ते त्यांचे काम करीत आहेत असो
शिवसेनेचे दीर्घकालीन नुकसान टाळण्याचा मी कृतीतून प्रयत्न केला आहे याचा अंतर्मुख होऊन विचार व्हावा
अहंकार बाळगून विधायक राजकारण, टिकाऊ राजकारण करता येत नाही हे यानिमित्ताने अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे मी मी पुन्हा येईन या वाक्याची आपण व आपले सहकारी शरद पवार यांनी चेष्टा केली होती परंतु मी पुन्हा येऊन सुद्धा खुर्चीचा तत्वासाठी व दीर्घकालीन राजकारणासाठी त्याग केला आहे याची इतिहास नोंद घेईल
माध्यमातून माझ्या या कृतीचे विविध पडसाद उमटतील हे मला माहीत आहे
आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे असे ओरडुन सांगत बसू नका खंजीर खुपसला आहे हे नक्की पण तो तुमच्या माणसांनी नाही तर परंपरागत विरोधी लोकांनी खुपसला आहे उलट तुमच्या माणसांनी तो बाहेर काढला आहे
तुमचे प्रिय घरगडी यांनी तो खुपसला आहे
आपण सुज्ञ आहात असे लिहिणार होतो पण आपण सुज्ञ व्हा असे लिहितो
अजून वेळ गेलेली नाही विचार करावा
आपला
देवेंद्र फडणवीस