राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे
लातूर विमानतळावर आ. कराड यांच्याकडून स्वागत
लातूर दि.१६- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तुळजापूरकडे जाण्यासाठी विमानाने लातूर विमानतळावर शुक्रवारी दुपारी आले असता त्यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची धाराशिव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून तत्पूर्वी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी लातूर विमानतळावरून हेलिकॉप्टरने तुळजापूरकडे रवाना झाले. यावेळी त्यांचे लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी मोदी @ 9 जनसंपर्क अभियान प्रदेश संयोजक आ. प्रवीणजी दरेकर, माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, औसा विधानसभेचे आ. अभिमन्यू पवार, भाजपाचे लातूर लोकसभा प्रचार प्रमुख दिलीपराव देशमुख, अहमदपूर विधानसभा समन्वयक विनायकराव पाटील, लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी शहराध्यक्ष शैलेश लाहोटी, जिपचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, विक्रमकाका शिदे, अशोककाका केंद्रे, प्रदेश सदस्य सतिष आंबेकर, अनिल भिसे, दिग्विजय काथवटे यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
