लातूर/प्रतिनिधी: भाजपाच्या वतीने मुस्लिम समुदायासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून समाज प्रगतीपथावर असल्याने शहरातील असंख्य मुस्लिम बांधवांनी लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वात पक्षात घेतला.
लातूर शहर भाजपाच्या वतीने ‘गांव चलो अभियान’ राबविले जात आहे.या अभियाना अंतर्गत आयोजित कार्यक्रमात पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील दहा वर्षांपासून अल्पसंख्यांक समाजासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.या योजनांमुळे समाजाचा विकास होत असून मुख्य प्रवाहासोबत हा समाज जोडला जात आहे.पक्षाने अप्लसंख्यांक समुदायाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले असून यामुळे अल्पसंख्यांक समुदायात भाजपा विषयी आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच असंख्य अल्पसंख्यांक बांधव भाजपाच्या विचारधारेशी जोडले जात आहेत.याच अनुषंगाने लातूर येथील मुस्लिम बांधवांनी देविदास काळे यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश घेतला.काळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी ‘गांव चलो’ अभियानाचे संयोजक बाबू खंदाडे,दिवार लेखन संयोजक विवेक बाजपाई, संजय गिरी,अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष मोहसीन शेख,सरचिटणीस दिग्विजय काथवटे,शिरीष कुलकर्णी,रवी सुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करताना देविदास काळे म्हणाले की,मुळात मुस्लिम समुदायाच्या मनात भाजपाविषयी आकस नाही परंतु स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षात काँग्रेसने केवळ वोटबॅंक म्हणून मुस्लिम समाजाचा वापर केला.हा समाज भाजपासोबत जोडला जाऊ नये यासाठी भाजपाची मुस्लिम विरोधी प्रतिमा तयार करण्याचे काम काँग्रेसने केले,
अपप्रचार केला.हे करताना अल्पसंख्यांक समाजाचा विकास व्हावा असे कुठलेही धोरण काँग्रेसने राबवले नाही. सत्तेत आल्यानंतर भाजपाने सर्वंकष विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून अल्पसंख्यांक समुदायावरही लक्ष दिले.समाजाच्या विविध मागण्यांची दखल घेत त्यांची पूर्तता केली. लातूरचाच विचार केला तर काँग्रेसची नेत्यांनी शादीखाना या एकाच विषयावर अनेक निवडणुका जिंकल्या.विधानसभा व अनेक निवडणुकांमध्ये शादीखान्याचं भुमिपुजनही केलं.पण प्रत्यक्षात शादीखान्याचं स्वप्न भाजपानं पूर्ण केलं.यामुळे अल्पसंख्यांक बांधवांचा समाजाचा पक्षावरील विश्वास वृद्धिंगत झाला.भाजपाने कधीही अल्पसंख्यांकांचा द्वेष केला नाही.मला तर पूर्वीपासूनच मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळत आहे.मी स्वत: मुस्लिम बहूल प्रभागातून नेतृत्व करतोय.याच समाजाच्या बळावर मी सलग चार वेळा नगरसेवक म्हणून विजयी झालो आहे.हा समाज कायमच विकासाच्या पाठीशी राहिला आहे.यापुढेही समाज असाच पक्षाच्या पाठीशी राहील याचा मला विश्वास आहे. भाजपाने मुस्लिमांसाठी विविध योजना राबवल्या. पंतप्रधान स्वनिधी योजना ही त्यापैकी अत्यंत महत्त्वाची ठरली.या योजनेच्या माध्यमातून छोट्या व्यवसायिकांना अर्थसहाय्य केले जाते. शहरातील मुस्लिम बांधवांना यातून मोठ्या प्रमाणात सहाय्य करण्यात आले.या माध्यमातून त्यांचे व्यवसाय उभे राहिले असून कोरोनाच्या काळात या योजनेमुळे अनेकांना लाभ झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक समाजाला सक्षम करण्यासाठी भाजपाचे काम सुरूच आहे,असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.यावेळी पक्ष पदाधिकारी जमीर भाई,मंडल अध्यक्ष प्रमोद गुडे,नासरभाई,नासीरभाई, राजाभाऊ सोनवणे,अरुण जाधव,महादेव कनगुले, सचिन मदने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.