19.2 C
Pune
Saturday, January 11, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*दुर्मिळ, अतिदुर्मिळ वृक्षसंपदा जतन करण्यासाठी बीज संकलन मोहीम*

*दुर्मिळ, अतिदुर्मिळ वृक्षसंपदा जतन करण्यासाठी बीज संकलन मोहीम*


हर घर नर्सरी उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात बी संकलन


लातूर ; दि.१ ( प्रतिनिधी) — दुर्मिळ, अतिदुर्मिळ वृक्षसंपदा जतनाची गरज आहे.एक वृक्ष जेव्हा नष्ट होतो, तेव्हा या वृक्षांवर आधारलेली परिसंस्था, अन्नसाखळीतील काही दुवे लुप्त होतात. यासाठी हे दुर्मिळ वृक्ष तत्काळ संवर्धीत करावे लागतात. लातूरसह जिल्ह्यातील अनेक शहराचा विस्तार वाढत गेला आहे. विकासाची कामे झाली‌ पण मात्र या नागरिकरणात काही दुर्मिळ, अतिदुर्मिळ झाडे नष्ट होत जात‌ आहे.


काही दुर्मिळ झाडे तर शहर/जिल्ह्यात फक्त एक किंवा दोन उरली आहेत.तर काही झाडे नष्ट झाली आहेत. काही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विशेषत: या परिसरात काही झाडे उरली आहेत. यासाठी अशा वृक्षांची बीजे तयार करुन रोपे तयार करणे यासाठी उपक्रम राबवला गेला. जवळपास १ लाख बी गोळा केले गेले. हा बी संकलनाचा अनोखा लातूर पॅटर्न मराठवाड्यात‌ राबविण्याची गरज आहे. ह्या बीज संकलनामुळे हर घर नर्सरी उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात बी जया झाले.
या दुर्मिळ प्रजातीचे संवर्धन करण्याची गरज ओळखून व हर घर नर्सरी या उपक्रमासाठी बी संकलन मोहीम महाराष्ट्र शासन लातूर जिल्हा प्रशासन, सह्याद्री देवराई लातूर, द संस्कृती फाउंडेशन, लातूर वृक्ष चळवळ या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने बीज संकलन मोहीम राबवली गेली.


यामध्ये प्रामुख्याने दुर्मिळ वृक्षांच्या प्रजातीचे बी संकलन करण्यात आले. हा बी संकलन उपक्रम रेणापूर, लातूर ,चाकूर तालुक्याच्या सीमेवर दव्हेली ,जानवळ ,वडवळ , झरी या परिसरात राबविला गेला. या परीसरातच ८४ एकर जमिनीवर वर सह्याद्री देवराई लातूर हा प्रकल्प वन विभागाच्या जागेवर उभा आहे. बीज संकलनामध्ये मासरोहिणी, आपटा, बेहडा, बहावा, अर्जुन, पळस ,गावरान आंब्याच्या कोया अश्या अनेक दुर्मिळ वृक्षांच्या बी संकलन करण्यात आले. अकरा पोते बी संकलन करण्यात आले. यामध्ये विविध संस्थांचे प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी ,शासकीय अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


उपस्थितांमध्ये नगरपंचायत चे आयुक्त श्री रामदास कोकरे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, नगरपरिषद रेणापूर न.प.चे मुख्याधिकारी मंगेश शिंदे सह्याद्री देवराई लातूरचे समन्वयक सुपर्ण जगताप, द संस्कृती फाऊंडेशनचे अभया मिरजकर, सह्याद्री देवराई व संस्कृती फाउंडेशन चे शिवशंकर चापुले, कृषी अधिकारी गोपाळ शेरखाने, डॉ दत्तात्रय दगडगावे, राम माने, प्रतिक्षा मोरे , विद्यार्थी, गावकरी, कर्मचारी हे सहभागी होते. या सगळ्या कार्यक्रमांचे समन्वय शिवशंकर चापुले, अभय मिरजकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]