जी.जी.कांबळे यांच्या पाच पुस्तक प्रकाशनात डॉ.श्रीपाल सबनीस यांचे आवाहन
लातूर,दि.९ः जाती व्यवस्था,ब्राम्हणी व्यवस्थाही ही विष आहेच,त्याचा धिक्कार झालाच पाहिजे,तथापि ब्राम्हणी विचारांचा विरोध करणारे बहुसंख्य घटकही संविधानाप्रती किती सजग आहेत,संविधानप्रेमी आहेत,असा रोकडा सवाल करत त्यांच्यात भरलेले क्रौर्य आजही बहुजांनातील घटकांवर अन्याय अत्याचार होताना प्रकर्षाने दिसून येतेय,जीवंत माणसांना जनावरांच्या गोठ्यात जेवण देतात,अशी नेमका विरोधाभास टिपत,विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्याबरोबरच ,ईश्वर,निरीशवरवादापेक्षा मानवाचेे कल्याण महत्वाचे असल्याने,साहित्यिकांनीबुध्द,कबीर,छ.शिवराय,तुकोबाराय,म.ङ्गुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे ,गाडगेबाबा यांच्या दुसर्याचे कल्याण,हित पाहण्याचा दृष्टिकोण असलेले,माणूस दुःखमुक्त करण्याचे आव्हान साहित्यिकांनी स्वीकारावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी येथे केले.
कथाकार जी.जी.कांबळे यांच्या वावरप्रकाशनप्रकाशित,निवडुंगाचे काटे याआत्मचरित्रासह,खुशी,दुरुडी,डागडर,आणि पंाढरं भूत या लघुकादंबरी- कथासंग्रहाचे प्रकाशन रविवार,दि.८ जानेवारी २०२३ रोजी डॉ.भालचंद्र रक्तपेढी सभागृहात डॉ.सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.सभारंभाच्या अध्यक्षपदी वावरचे प्रकाशक डॉ.भास्कर बडे होते,तर डॉ.दयद्रथ जाधव, डॉ.गणेश लहाने,डॉ.सुनिता सांगोले हे भाष्यकार व श्रीमती सबनीस,सविता कांबळे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.सबनीस म्हणाले की,आजपर्यंत आलेल्या दलित आत्मकथनापेक्षा जी.जी.कांबळे यांच्या निवडुंगाचे काटे मध्ये अत्यंत संयमीपणा,विज्ञानवाद,कथाकथन,अंधश्रध्दा निर्मूलन, माणूसकी,योगासनाचे महत्व,सोयरिक जुळवणे,आदर्श शिक्षक,विचारवंत,व्यसनमुक्ती,गावाप्रतीची बांधिलकी,प्रबोधनासोबतच स्वतजातीबरोबर,इतरांप्रतीही प्रेम,जिव्हाळा,आपलेपणाचा ठायीठायी प्रत्यय येतो,नात्यागोत्यातली माणसंही निष्ठूर असतात यांचा वेध शांतपणे घेतलेला आहे,वडिलांचं केवळ शिक हे नेहमीच सांगणं,नापास झाला तरी पुन्हा परिक्षा दे म्हणून पाठबळ देणं हे भावून जातं.बुध्दाची करुणा त्यांच्या साहित्यातून ओसंडून वाहते,विवेकी विद्रोहाची त्यांनी पेरणी केली असून,गुरुजीपणाची त्यांनी व्याख्याच बदलली आहे, खरे तर शिक्षक हा लोकशिक्षक व्हायला हवे ते येथे सार्थ ठरले आहे,खुशी पुस्तकातून एका जिद्दी मागासवर्गीय महिलेची चिवट गाव विकास,लोकशाहीसाठीची झुंज, गावचे जातीय,भ्रष्ट राजकारण स्पष्ट करतानाच मुस्लिम समाजातला आपलेपणा यात दिसते. डागडर मधून उपचाराअभावी मेलेल्या आईच्या स्मरणार्थ प्रकाश डॉक्टरकीचे शिक्षण घेवून लोकांना सेवा देतो, बाहेर डॉक्टर आत आहेत,अशी पाटी लावतो,अशा जिद्दी तरुणाची कथा पुढे येते,पांढरं भूत मधून प्रबोधनावर भर आहे,तसेच आई-वडिलांना विसरणार्यांचा खरपूस समाचार आहे,अशी ही सर्व ग्रंथसंपदा वाचनीय आहे, असेही ते म्हणाले.
जी.जी.कांबळे हे प्र.ईं.च्या परंपरेचे पाईक आहे,त्यांचे आत्मचरित्र म्हणजे विज्ञाननिष्ठा, प्रबोधन,व्यसनमुक्ती,माणूसकीचा ठेवा आहे,आत्मचरित्र म्हणजे साठ ते सत्तर वर्षांच्या सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक अनुभवाचा एक दस्ताऐवजच असतो,स्वाभीमानी माणूस प्रतिकुलतेवर मात करुन पुढे जातो,यांचे प्रत्यंतर येथे येते,असे सांगून,आज समाजाला तोडण्याची भाषा होतेय,याचा विचार करावा लागेल असे मत डॉ.जयद्रथ जाधव यांनी व्यक्त केले.
पांढरं भूत कथासंग्रहातून खाउजा धोरणाच्या स्वीकारानंतर आरक्षण डावलणे,नात्यातला हरपलेला ओलावा,अंधश्रध्दा,विनाअनुदान शिक्षण,कर्मकांड, वृध्दाश्रम,गावाविषयीची तळमळ आदींचा लेखाजोखा मांडलेला आहे,असे विचार डॉ.गणेश लहाने यंानी मांडले.
शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत मिळत नाही,गायकवाड गुरुजी प्रकाशला प्रोत्साहन देवून डॉक्टर बनवितात,गोष्टी वाचून संस्कार घडतात.मनोरंजनासोबतच ंसंस्कार करणारी दुरुडी लघुकादंबरी आहे, तर खेड्यातील जातव्यवस्थेचे भोग,महिलांचे,दलितांचे प्रश्न,खास्ता खाणारी महिला हार न मानता भ्रष्ट गोष्टीला विरोध करणारी खुशी कांदबरी असल्याचे डॉ.संगीता सांगोले यांनी नमुद केले.
निवडुंगाचे काटे हे दखलपात्र आत्मचरित्र ठरले आहे,नकारासोबत संयम पानापानांवर दर्शवितो असे सांगून डॉ.भास्कर बडे यांनी अध्यक्षीय समारेाप केला.लेखक जी.जी.कांबळे यांनी लेखनामागणी भूमिका विषद केली. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यंाच्या प्रतिमेस अभिवादन,दीपप्रज्वलनानंतर मान्यवराचे व परिश्रमींचे शाल,स्मृतीचिन्ह,ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे यंानी केले,सुभाष मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मोहन कांबळे सेलूकर,आर.बी.राजेगावकर,प्रदीप कांबळे, अशोक सूतार, हरिभाऊ कोनाळीकर,उत्तम गायकवाड,चित्रकार दत्ता वालेकर,राहूल कांबळे,ऍड.अण्णाराव कांबळे, दिलीप गायकवाड,पूजा कंाबळे, विमल मदने,ज्योती कांबळे,श्रावण मस्के,रेखा कांबळे, विठ्ठल जाधव,कैलास कांबळे, सी.आर.बनसोडे, अशोक सुतार, डॉ.दयानंद कुटवाडे, शिला बरुरे, चंद्रकांत कल्याणी, अर्जून सोनाळे, प्रभाकर गोविंदवाड, तानाजी कुंभार, मोहन बिडवे,बाळ होळीकर,डी.एस.नरसिंगे,मस्के, वीरकर आदिंनी सहकार्य केले.या कार्यक्रमाला ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे,डॉ.एस.एस.कुलकर्णी, रमेश हणमंते,प्रकाश घादगिणे,शिवाजी साखरे वाघ यांच्यासह असंख्य साहित्यप्रेमी उपस्थित होते.