उदगीरकर, ब्रिजवासी व मुंदडा उपाध्यक्ष तर बरुरे यांची सचिव म्हणून निवड
लातूर/प्रतिनिधीः– लातूर जिल्ह्यात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून अद्यापर्यंत हा व्यवसाय करणार्यांची कोणतीही संघटना नव्हती. त्यामुळे हॉटेल व्यावसायीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन हॉटेल व्यावसायकांनी एकत्रीत येऊन दि फेडरेशन ऑफ हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनची स्थापना केलेली आहे. या असोसिएशनची कार्यकारणीही जाहीर करण्यात आलेली असून याच्या अध्यक्षपदी प्रवीण कस्तुरे तर उपाध्यक्ष म्हणून प्रसाद उदगीरकर, संजीवकुमार मुंदडा, विक्रम ब्रिजवासी यांची व सचिवपदी संदेश बरूरे यांची निवड करण्यात आलेली आहे. या असोसिएशनचे सदस्य म्हणून जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायकांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून हा व्यवसाय करणार्यांची कोणतीही संघटना नव्हती. परिणामी या व्यावसायीकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. तसेच हॉटेल व्यवसाय व शासन आणि प्रशासन विभाग यांच्यात सुसंवाद ठेऊन या व्यवसायासंबंधी कायद्यातील नवीन बदल आणि त्या संबंधी येणार्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीकोनातून हॉटेल व्यावसायीकांची संघटना असावी असा मानस व्यक्त करण्यात आला होता. त्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायीकांनी एकत्रीत येऊन दि फेडरेशन ऑफ हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन लातूरची स्थापना केलेली आहे.
या असोसिएशनची नुतन कार्यकारणीही या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये अध्यक्षपदी प्रवीण कस्तुरे तर प्रसाद उदगीरकर, संजीवकुमार मुंदडा व विक्रम ब्रिजवासी यांची उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झालेली आहे. सचिव म्हणून संदेश बरुरे, सहसचिव म्हणून महेश सुडे, कोषाध्यक्षपदी सोहेल शहा तर सहकोषाध्यक्ष म्हणून विरेंद्र सावंत यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे. कार्यकारणी सदस्य म्हणून आदित्य सोनवणे, आशितोष बेंळबे, भालचंद्र थळकरी, गणेश पाटील, देवेंद्र आदेप्पा, प्रतापसिंह बिसेन, सागर अग्रवाल, सागर रविंद्र अग्रवाल, प्रवीण मिटकरी, अभय धुमाळ, प्रविण सरदेसाई यांची निवड झालेली आहे. या नुतन कार्यकारणीचे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायीकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आलेले आहे.
दि फेडरेशन ऑफ हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ही केवळ हॉटेल व्यावसायीकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यरत राहणार नसून सामाजिक जाण ठेवत जिल्ह्यात होणार्या विविध सामाजिक व समाजहिताच्या उपक्रमांमध्येही तितक्याच तत्परतेने सहभाग नोंदवेल अशी ग्वाही देऊन नुतन अध्यक्ष प्रविण कस्तुरे यांनी या असोसिएशचे सदस्य म्हणून जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायीकांनी आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.