28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*दिशा प्रतिष्ठान चे कार्य दिशादर्शक*

*दिशा प्रतिष्ठान चे कार्य दिशादर्शक*

दिशा प्रतिष्ठानची लोक दिशेकडे वाटचाल.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना 160000 रू चे चेक वाटप व सेवाभावी डॉक्टरांचा सत्कार.

लातूर –

 लातूर येथील दिशा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्याना शिक्षणासाठी सहकार्य म्हणून 10 विदयार्थ्यांना 1 लाख 60 हजार रुपयांचे शैक्षणिक सहकार्य व सोबतच दिशा प्रतिष्ठानच्या दिशा क्लिनिक येथील सेवाभावी डॉक्टरांचा सत्कार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
 समाजासाठी काहीतरी चांगले काम करण्याच्या उद्देशाने एकत्र आलेले तरुण दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून आरोग्य सेवा व गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करीत आहेत. दिशा प्रतिष्ठानची समाजसेवेची दिशा अतिशय योग्य असून या कार्यात दिशा प्रतिष्ठानला हवी ती मदत करून या निस्वार्थ समाजसेवेचा विस्तार वाढवण्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही याप्रसंगी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली.

दिशा प्रतिष्ठान द्वारा चालविण्यात येणाऱ्या 60 फुटी रोडवरील दिशा क्लिनिकला रविवारी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी भेट देऊन क्लिनिकची पाहणी केली तसेच दिशा प्रतिष्ठान द्वारा चालविल्या जाणाऱ्या फिरत्या दवाखान्याची ही पाहणी केली या निमित्ताने अक्षता मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, दिशा प्रतिष्ठानचे सल्लागार अभिजीत देशमुख डॉक्टर अशोक पोद्दार तसेच पृथ्वीराज शिरसाट, संभाजी रेड्डी, सुरेश सुरेश गोजमगुंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती
कोरोना काळात दिशा प्रतिष्ठानने केलेले कार्य लक्षणीय होते असे नमूद करून माजी मंत्री दिलीपराव देशमुख पुढे म्हणाले वाढती लोकसंख्या आणि विषम हवामान यामुळे आजाराच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आह.
त्याला तोंड देण्यासाठी चांगले डॉक्टर असणे आवश्यक आहे आणि लातूर शहरात चांगले डॉक्टर्स आहेत ही मोठी उपलब्धी लातूरची आहे. दिशा प्रतिष्ठानने निवडक गावात फिरता दवाखाना च्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचे जे काम सुरू केले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. शहराच्या पूर्व भागात देखील दिशा क्लिनिक च्या माध्यमातून रुग्णसेवा केली जाते हे अतिशय अभिनंदन या बाब आहे.
याप्रसंगी दिशा प्रतिष्ठान मध्ये सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करणारे डॉक्टर यांचा या निमित्ताने सत्कारही करण्यात आला. त्यात डॉ.हर्षवर्धन राऊत, डॉ. सि.टी कांबळे, डॉ.आनंद पाटील, डॉ. नंदकुमार धर्माधिकारी, डॉ,रोहन अकोसकर, डॉ.हनुमंत किनीकर, डॉ.सुधीर फत्तेपूरकर,
डॉ.ब्रिजमोहन झंवर, डॉ.अरविंद भातांब्रे, डॉ, प्रियंका वडजे, डॉ. सुनिता पाटील, डॉ.प्रदीप नागूरे, डॉ.अमोल देशमुख, डॉ. निखिल काळे, डॉ.हेमंत केंद्रे, डॉ.अनमोल गवारे, डॉ.योगेश माने, डॉ.सूर्यकांत तोडकर यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सन्मानपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच हुशार आणि होतकरू असलेल्या 10 विद्यार्थ्यांना ही याप्रसंगी चेक देऊन शिक्षणाकरिता सहकार्य करण्यात आले.
याप्रसंगी दिशा प्रतिष्ठानचे संचालक प्रसाद उदगीरकर, रतन बीदादा, किशोर भुजबळ हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी दिशा प्रतिष्ठान करत असलेल्या शैक्षणिक मदत, फिरता दवाखाना व दिशा क्लिनिक यांच्या संपूर्ण कार्याची माहिती देऊन केले. सूत्रसंचालन दिशा प्रतिष्ठानचे संचालक व फिरत्या दवाखान्याचे समन्वयक इसरार सगरे यांनी तर आभार दिशा क्लिनिकचे प्रमुख दिनेश गोजमगुंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव जब्बार पठाण, प्रकल्प समन्वयिका वैशाली यादव व संचालक विष्णुदास धायगुडे यांनी केले.
याप्रसंगी मुंडे परिवाराच्या वतीने ही दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]