24 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसामाजिक*'दिशा दप्तर' योजनेचा जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज यांच्या हस्ते शुभारंभ*

*’दिशा दप्तर’ योजनेचा जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज यांच्या हस्ते शुभारंभ*

लातूर ; दि.१२-( प्रतिनिधी) -आपल्या नाविन्यपूर्ण आणि कल्पक संकल्पनेमुळे नेहमीच समाजात कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय असलेल्या दिशा प्रतिष्ठानचा अजून एक नवीन आणि अभिनव प्रकल्प ‘दिशा दप्तर’ चा शुभारंभ काल लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या हस्ते करण्यात आला.

शाळेत शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना एक दप्तर ज्यात की वह्या, कंपास, शूज, सॉक्स, अशा उपयोगी वस्तू असतील अस दप्तर हे देण्यात येणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे हे दप्तर आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले शाळकरी विद्यार्थीच या गरजू विद्यार्थ्यांना डोनेट करणार आहेत. या माध्यमातून त्यांच्यावरही एक सामाजिक संस्कार होणार आहे की आपणही समाजाच, आपल्या सारख्याच/आपल्या वयाच्याच एका विद्यार्थ्याच देणं लागतो. समाजात अशीही मुलं असतात जी की आपल्याच वयाची, आपल्या सारखीच शाळेत जाणारी असतात पण त्यांना एक दप्तर आणि त्यातील साहित्य ही मिळणं कठीण असत आणि ते आपण त्यांना दिलं पाहिजे ही सामाजिक भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न दिशाचा आहे.

साधारण एक हजार दप्तर यावर्षी संकलित करून वितरित करण्याचा दिशाचा मानस आहे. काल विविध शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी साधारण 151 दप्तर जिल्हाधिकारी यांना हस्तांतरित करून या योजनेचा शुभारंभ केला. पुढील दीड ते 2 महिन्यात उर्वरित सर्व दप्तर समाजातील विविध घटकांच्या माध्यमातून संकलित केले जातील. त्यासाठी दिशा एक google pay number आणि account number देणार आहे.

काल जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराज यांनी दिशाच्या या योजनेचे खूप कौतुक करतानाच स्वतः कडून 5 दप्तर दिशाला डोनेट केले. तसेच दिशाच्या सामाजिक कामासाठी जेंव्हा ही त्यांची अवश्यकता असेल तेंव्हा वेळ देण्याचे आशवस्त करून दिशाच्या कामाबदल एक विश्वास दर्शवला. त्यांना स्वतःला दिशाच्या आलेल्या चांगल्या अनुभवच कथन ही केलं.
श्री तुकाराम पाटील यांचेही समयोचित मनोगत झाले. त्यांनी लातूरची सामाजिक बांधिलकी जपणारी संस्कृती यावेळी अधोरेखित केली.
डॉ ज्योती सुळ यांचे ही खूप भावस्पर्शी मनोगत यावेळी झाले. दिशाचा प्रवास आणि त्या माध्यमातून समाजातील अनेकांना वंचित घटकांसाठी काहीतरी करण्याची संधी दिशाच्या माध्यमातून मिळत आहे याबद्दल आभार व्यक्त केले.
स्टीम एज्युकेशन लातूर येथील हॉल मध्ये संपन्न झालेल्या समारंभाचे प्रास्ताविक ओमप्रकाश झुरुळे,सूत्र संचलन प्रा परमेश्वर पाटील यांनी केले तर आभार इसरार सगरे यांनी मानले.
यावेळी दिशा प्रतिष्ठानचे सर्व संचालक, सर्व बाल दाते आणि त्यांना प्रोत्साहित करणारे त्यांचे पालक ही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]