16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeराजकीयदिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन

लातूर प्रतिनिधी : १८ एप्रिल २०२२ :

 महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवार दि. १८ एप्रिल रोजी लातूर काँग्रेस पक्षाच्या वतीने लातूरचे ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिर येथे आरती केली, सुरतशहावली दर्गा येथे चादर चढवून आणि श्री. साईबाबा मंदिर विशाल नगर येथे आरती करून दिलीपरावजी देशमुख यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

  यानंतर शहरातील विविध प्रभागातील विकास कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले मुख्यत्वे प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 4 येथे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरणजाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासमचे उद्घाटन करण्यात आले. तीव्र उन्हाळ्याची लाट पाहता लातूर शहरातील फुटपाथवर विविध व्यवसाय करणाऱ्या गरजू व्यावसायिकांना छत्री वाटप करण्यात आली. याप्रसंगी अनेक छोट्या व्यावसायिकांनी दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या.

  याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष किरण जाधव, लातूर जिल्हा नियोजन समिती सदस्य समद पटेल, स्वाती जाधव, गोरोबा लोखंडे, विजयकुमार साबदे, हकीमभाई शेख, चांदपाशा इनामदार, कैलास कांबळे, युनूस मोमीन, सचिन मस्के, फारुक शेख, पंडीत कांवळे, ॲड. देविदास बोरुळे पाटील, संभाजी सूळ, डॉ. बालाजी सांळुके, विण सूर्यवंशी, अहमदखान पठाण, सोजरबाई मदने, प्रा.प्रविण कांबळे, तबरेज तांबोळी, रघुनाथ मदने, सुंदर पाटील कव्हेकर, गणेश देशमुख, विष्णूदास धायगूडे, अभिषेक पतंगे, अभिजीत इंगे, करीम तांबोळी, वर्षा मस्के, कल्पना मोरे, सुरेखा कारेपूरकर, असिफ बागवान, कमलबाई मिटकरी, मोहन सुरवसे, शिवाजी कांबळे, प्रा.एम.पी.देशमुख, बालाजी झिपरे, अमित जाधव, कुणाल वागज, बप्पा मार्डीकर, ज्ञानेश्वर सागावे, जालीदर बर्डे, इसरार पठाण आदी उपस्थित होते.

—————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]