लातूर :
विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री व सत्संग सहप्रमुख दादा वेदक यांनी श्री गुरूजी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली.विश्वहिंदू परिषदेचे भारतभर हितचिंतक जनसंपर्क अभियान चालु आहे. या अभियाना अंतर्गत दादा वेदक यांनी श्री गुरूजी पतसंस्थेला भेट देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर पतसंस्था अध्यक्ष अतुल ठोंबरे, विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख ॲड गौरीशंकर कौळखेरें उपस्थित होते.
श्री किशोर कुलकर्णी सर यांनी प्रास्ताविक व सर्वांचा परिचय करून दिला. दादा वेदक यांनी मनोगत व्यक्त करत विश्व हिंदू परिषदेची व जनसंपर्क अभियानाची माहिती दिली.
पतसंस्था अध्यक्ष अभि.अतुल ठोंबरे यांनी दादा वेदकांचा यथोचित गौरव करून आभार व्यक्त केले. यावेळी पतसंस्था संचालक महेश औरादे, रविकांत मार्कंडेय,प्रा.दत्तात्र्येय मुंढे, केशव शिंदे,मनोज सप्तर्षी, संजय कुलकर्णी,अमृता देशपांडे पतसंस्था कर्मचारी विश्वहिंदू परिषदेचे कार्यकर्ते इ उपस्थित होते.