दहावी नंतर पुढे काय ?

0
228

 

लातूरच्या प्राध्यापकांनी केले ११ वी प्रवेशाबाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन

स्वातंत्र्यदिनी सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचा कार्यक्रम

लातूर –इयत्ता १० वी नंतर पुढे काय, असा प्रश्न अनेक विद्यार्थी व पालकांना जटिल वाटतो. विद्यार्थ्यांची मानसिकता, कल, क्षमता आणि भवितव्याच्या दिशा यांबद्दल साशंकता आणि उमेद अशा दोन्ही बाबतीत योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज असते. विशेषत: ग्रामीण भागातील आणि गोरगरीब कुटुंबातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांची याबाबतीत केवळ अज्ञानामुळे कुचंबणा आणि फसवणूक होते. यावर्षी कोविडमुळे या गोंधळात अजूनच भर पडली आहे.

प्रा. डॉ उमा कडगे

हे लक्षात घेवून स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दि. १५ ऑगस्ट, २०२१ रोजी सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानतर्फे दूरस्थसंपर्क (ऑनलाईन) माध्यमातून अभ्यासू आणि अनुभवी अशा निष्णात प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांतील प्रा. नितीन वाणी, प्रा. मनोहर कबाडे, प्रा. शैलेश कानडे व डॉ. उमा कडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रा.शैलेश कानडे

विज्ञान शाखा म्हणजे फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर, वाणिज्य शाखा म्हणजे फक्त लेखापाल आणि कला शाखा म्हणजे सर्व दुय्यम सेवा असणारे भवितव्य हा रूढ झालेला समज चुकीचा असून, सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांना भवितव्याच्या विविध संधी अनेक सेवांच्या माध्यमातून उपलब्ध होवू शकतात, असा एकमुखी विचार चारही प्राध्यापकांनी अतिशय सोप्या आणि आस्थेवाईकपणे विद्यार्थ्यांना सांगितला व अनेक आकर्षक पद्धतींनी सर्व शाखांच्या संधींची उकल मांडून दाखवली.

प्रा नितीन वाणी

विज्ञान शाखेत वैद्यकीय व्यवसायाहून नामांकित संस्थांतून संशोधकांसारख्या इतर अनेक प्रगतशील सेवा उपलब्ध आहेत, हे प्रा. नितीन वाणी यांनी पटवून दिलेच; पण वाणिज्य आणि कला शाखांचेही क्षितिज अतिशय विस्तृत असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विविध प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी तर तुलनेने अधिक संधी उपलब्ध असल्याचे मत प्रा. शैलेश कानडे व डॉ. उमा कडगे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मनोहर कबाडे होते.

कबाडे सर

राज्यभरातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. नजिकच्या काळात या प्रकारचे मार्गदर्शन प्रवेशादरम्यान व प्रवेशपश्चातही आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. मनोहर कबाडे व प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली.

DR. SANTOSH S. KULKARNI,

SECRETARY,

SKS PRATISHTHAN

14, Platinum Apartments,

Desai nagar, Nanded-Solapur Ring Road,

Latur – 413 512

MOB.: 91-8329032164 / 7588062546

EMAIL ID – skspratishthan@gmail.com / drsantoshkulkarni32@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here