उस्मानाबाद / प्रतिनिधी–
कळंब येथे महावितरण मध्ये सहाय्यक लेखापाल म्हणून कार्यरत असणारे दयानंद बनसोडे यांना लातूर महावितरण विभागात उपव्यवस्थापक वित्त व लेखा या पदावर पदोन्नती मिळाली आहे.
लातूर जिल्हयातील दयानंद बनसोडे यांनी आपल्या अथक परिश्रामाच्या जोरावर महावितरणमध्ये हे यश मिळवले आहे. त्यांनी लातूर, उस्मानाबाद जिल्हयात अनेक ठिकाणी काम केले आहे. कळंब येथे सहाय्यक लेखापाल म्हणून काम करत असतानाच त्यांना उपव्यवस्थापक वित्त व लेखा पदावर महावितरण विभाग लातूर येथे पदोन्नती मिळाली आहे. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.