30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*तुम्ही कधीही हाक मारा वृक्ष चळवळीच्या पाठीशी मी उभा आहे-सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे*

*तुम्ही कधीही हाक मारा वृक्ष चळवळीच्या पाठीशी मी उभा आहे-सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे*

लातूर/प्रतिनिधी

पर्यावरणाचं कार्य करणाऱ्या सह्याद्री देवराई लातूर,लातूर वृक्ष चळवळीला  २०१६ पासून वेऴवेळी भेट देऊन सहकार्य करणारे   चित्रपट अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत साई मंदिर येथे  दुपारी ४.३० वाजता वृक्षारोपण केले . मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते  कदंबाचे वृक्ष रोपण करण्यात आले.

यावेळी ते म्हणाले विविध जातीची, जैवविविधता असलेली आपली झाडे, वनराई, देवराई, रानमळा, आमराई ही लोप पावत चाललेली आहेत. लातूरचा माझा मित्र स्वतःची मुंबई, गुजरात स्थित असलेली नौकरी सोडून आपल्या रानासाठी, वनासाठी आपल्या मातीसिठी वृक्ष चळवळ उभं करतोय   या  सुपर्ण जगताप यांच्या पाठीशी तुम्ही उभे रहा असे भावपूर्ण उदगार सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सह्याद्री देवराई लातूर व लातूर वृक्ष चळवळीच्या वृक्षारोपण कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

तसेच यावेळी त्यांनी कदंब वृक्षावरील गाणे त्यांनी म्हणून दाखवले.

कदंब-तरूला बांधुनि दोला, उंच-खालती झोलेपरस्परांनी दिले-घेतले,गेले ! ते दिन गेले,ते दिन गेले.

हे उपस्थितांना  सुरात म्हणून दाखवले. यावेळी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला उपस्थितांनी त्यांच्यातील एक जीवंत कलाकार अनुभवला. ज्याप्रमाणे निसर्गचा -हास होतोय दुर्मिळ झाडांची जैवविविधता नष्ट होत आहे त्याप्रमाणे माणसं पण लोप पावत आहेत. निसर्गाची , माणसांची जैवविविधता नष्ट होत आहे.मनाचे विविध पण हरवत गेले आणि सृष्टीचा क्रमच बदलत गेला. मनमानातला नैसर्गिक सुगंध कुठे गेला कुणास ठाऊक? तो सुगंध तुमच्या सारख्या मोजक्या माणसांनी जपलाय म्हणून मी तुमच्या सोबत या वृक्ष चळवळी सोबत उभा टाकण्यासाठीच इथे आलोय.एक मोठा चित्रपट अभिनेता असला तरी तो कसा असावा याची प्रचिती उपस्थितांना आली.खरं तर ते सह्याद्री देवराई किंवा मांजरा देवराई ची भेट देणार होते. पण तरीही मला वृक्ष चळवळीसाठी मला झाड लावायचे आहे म्हणून  वृक्ष चळवळीतील  सर्व मित्रांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी स्वतः वेळात वेळ काढून वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.  

यावेळी लातूर वृक्ष व सह्याद्री देवराई चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप, डॉ. बी आर पाटील सर, प्राचार्य निलेश राजेमाने, अँड मधुकर कांबळे, शिवशंकर चापुले, मयुर बनसोडे,पत्रकार सितम सोनवणे, इस्माईल शेख, अमोल इंगळे,ऋषीकेश दरेकर, योगेश मग्गीरवार, अॕड सुनील गायकवाड, साई मंदिर चे समन्वयक डॉ शहा, विशाल कांबळे, डॉ निलम जाधव- पन्हाळे, प्रवीण पारीख , डॉ दशरथ भिसे, नेताजी जाधव, भीम दुनगावे , मयुरी काळे, अर्पिता, मोनिका, श्रुती, अँड बालाजी इंगळे, महेश बिडवे, वैष्णवी खलसे , अंकीता लोखंडे, सरीता शिंदे व अनेक मित्र पर्यावरण प्रेमी सहकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]