निलंगा,-(प्रशांत साळुंके)-
कोरोना या महामारीची लाट ओसरल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी प्रथमच निलंगा तालुक्यातील मसलगा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गुरुजी बनवण्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे
शाळेतील विद्यार्थ्यांचा बौद्धिक शैक्षणिक व शारीरिक विकास व्हावा म्हणून शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शाळेत अनेक उपक्रम घेतले जातात परंतु गेल्या तीन वर्षांपूर्वी कोरोना सारख्या महाभयानक रोगाचे देशामध्ये मोठे संकट आल्याने शहरांसह गाव… गल्ल्या… ही लॉकडाउनच्या बेड्यात अडकल्या याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला.गेल्या काही दिवसापासून अनलॉक झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळा गजबजून गेल्या आहेत तब्बल तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शाळेतील विद्यार्थीच स्वयंशासन दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी गुरुजी बनले होते हातात पुस्तक घेऊन प्रत्येक वर्गावर जाऊन शिकवत होते मुख्याध्यापक म्हणून वैष्णवी नरहरे उपमुख्याध्यापक म्हणून मुस्कान शेख यांच्यासह सातवी वर्गातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिक्षकाची भूमिका दिवसभर बजावली
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग साळुंखे उपाध्यक्ष अरविंद शिंदे मुख्याध्यापक मोहन मोरे किसन घारूळे दिलीप मलिशे विठ्ठल बडे प्रणिता हल्लाळे शारदा जागले सागरबाई गंगणे दीपा माने राधिका पाटील आदींची उपस्थिती होती.