चार दिवसात तोडगा नाही काढला तर एकाही मंञ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही….
भाजपा प्रदेश सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचा राज्य सरकारला इशारा इशारा
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-
चार दिवसात एस.टी.कामगारांच्या विलनीकरणावर तोडगा नाही काढला तर राज्य सरकार मधील एकाही मंञ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.
दिनांक ११ रोजी निलंगा येथील शिवाजी चौकात आगारातील कर्मचाऱ्यांनी भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन केले यावेळी युवा नेते निलंगेकर बोलत होते.
पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले की शंभर दिवसा पेक्षा अधिक काळापासून एस.टी.कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विलनीकरणासाठी व विविध मागण्या घेऊन संप पुकारला आहे.त्यांच्या सहनसिलतेचा अंत न पहाता सरकारने एस.टी.कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करावेत.तसेच हिंदू -हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर कामगारांचा प्रश्न एका झटक्यात निकाली काढले असते,या संपात राज्यात एकूण ८५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असल्याचा आरोप निलंगेकर यानी केला.या महाविकास आघाडी सरकावर कोणत्याही घटक समाधानी नाही.शेतकरी मजूर शेतमजूर,कष्टकरी कामगार कर्मचारी, पोलिस कर्मचारी समाधानी नाहीत,येत्या चार दिवसात हा एस.टी.कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली नाही काढला तर राज्य शासनातील एकाही मंञ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा सज्ड इशारा दिला आहे.
तत्पूर्वी निलंगा शहरातील मुख्य ठिकाणी लातूर बिदर रस्ता दोन तास एस.टी.कर्मचाऱ्यांनी आडवून ठेवला होता.त्यामुळे रहदारीस बराच वेळ अडथळा निर्माण झाला होता.राज्य शासनातील निष्क्रिय सरकारमधील मंञ्याच्या विरोधात एस.टी.कामगारांनी घोषणा देत तिव्र निषेध नोंदवला झोपेचे सोंग घेतलेल्या महाविकास आघाडी सरकारने वेळीच एस.टी.कामगारांचा प्रश्न मार्गी न लावल्यास मोठी किंमत मोजावी लागेल व संपूर्ण राज्यात कोणत्याही मंञ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे.
यावेळी बाळासाहेब शिंगाडे,विरभद्र स्वामी,मनोज कोळ्ळे,किरण बाहेती,शरद पेठकर,माधव फट्टे,तम्मा माडीबोने,पिंटू पांचाळ यांच्या सह शेकडो एस.टी.कर्मचारी महिला कर्मचारी या रास्तारोको मध्ये सहभागी झाले होते.