लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात अखिल भारतीय मराठवाडा साहित्य संमेलन पूर्वनियोजन बैठक संपन्न
उदगीर (दि.24)
बुधवार रोजी लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे बैठक संपन्न झाली. याप्रसंगी मंचावर उपस्थित संमेलनाचे प्रमुख स्तंभ व ज्यांच्या अथक परिश्रमातून हे संमेलन उदगीर नगरीत होत आहे ते रामभाऊ तिरुके , क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोदजी बापट, देवगिरी प्रांत कार्यवाह हरीशजी कुलकर्णी, प्रवीण सरदेशमुख, डॉ. प्रसन्ना पाटील, प्रशांतजी चौधरी, संतोष तिवारी, उमेश सेलूकर तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रंथपूजन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उदगीर सारख्या छोट्या शहरात साहित्याचा मोठा उत्सव होत आहे म्हणून आईच्या भूमिकेतून पुढे येऊन आपण सर्वांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन रामभाऊ तिरुके यांनी केले.
प्रमोदजी बापट यांनी असे सांगितले साहित्यिक महंतांच्या स्वरूपात भरभरून साहित्य दान देण्यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत आहेत ते आपण प्रसन्न मनाने स्विकारावयाचे आहे. तर उदगीर शहराची विजयाची परंपरा कायम राखून साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन हरिशजी कुलकर्णी यांनी केले. वाचन संस्कृती लोप पावते की काय अशी भीती जाणवत असताना आपल्या दारी साहित्य मेळावा भरणे हा खूप मोठा उत्सव आपल्यासाठी आहे असे उमेश जी सेलूकर यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी संमेलानात कार्यरत असलेल्या शिक्षकांनीही आपले मत व्यक्त केले. श्रीपाद सीमंतकर, स्मिता मेहकरकर, प्रीती शेंडे, निता मोरे, एकनाथ राऊत तर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप राव कुलकर्णी , प्रशांत चौधरी यांनीही यासंदर्भात मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता येलमटे, प्रस्ताविक व परिचय प्रवीण सरदेशमुख, वैयक्तिक पद्य व शांती मंत्र मुकुंद मिरगे , ऋणनिर्देश प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप राव कुलकर्णी यांनी केले..