माजी खासदार डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना हार्वड यूनिवर्सिटी अमेरिकात “द मोस्ट इन्स्पाइरिंग पर्सन”अवार्ड घोषीत
मुंबई (विशेष प्रतिनिधी):–लातूर चे लोकप्रिय माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर एडवोकेट सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांनी मिळवलेल्या अनेक विषयातील पदव्युत्तर डिग्र्या ची दखल घेऊन एजुकेशन क्षेत्रातील जागतिक दर्जाचा “लंडन ऑर्गेनेशन ऑफ स्कील डेवलपमेंट” LOSD या संस्थेकडून माजी खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना हार्वड यूनिवर्सिटी अमेरिका येथे “द मोस्ट इन्स्पाइरिंग पर्सन”अवार्ड देऊन डॉ गायकवाड यांचा गौरव करण्यात येणार आहे.
प्रोफेसर डॉ सुनील वत्सला बळीराम गायकवाड हे लातूर लोकसभा मतदार संघाचे २०१४-२०१९ या कालावधीत लोकप्रिय खासदार म्हणून त्यांनी काम केले आहे.त्यांच्या कल्पकतेतून लातूर चे अनेक विकास कामे केली प्रामुख्याने रेल्वे मेट्रो बोगी कारखाना,सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल,पासपोर्ट सेवा केंद्र,रेल्वे स्टेशन चे आधुनिकीकरण,हिंदी लायब्ररी,उदगीर,लातूर रोड रेल्वे स्टेशन ला नवीन दादरा,नवीन प्लेटफॉर्म,रेल्वे विद्युतीकरण,लातूर नांदेड हिंगोली ला नीट परीक्षा केंद्र सुरू,रेल्वे नी लातूर ला पाणी,जलयुक्त शिवाराची करोडो रुपयाची कामे केली,लातूर रेल्वे स्टेशन वर व्हीआयपी लाउंज,अनेक नवीन रेल्वे गाड्या सुरू केल्या,खासदार निधीतून रेल्वे प्रवाशीसाठी बसण्यासाठी स्टील बेंचेस ची व्यवस्था केली,मोठा वेटिंग हॉल बनवला,रत्नागिरी नागपूर हाईवे बनवण्या साठी लोकसभेत मागणी केली,टेंभुर्णी लातूर रस्ता साठी लोकसभेत मागणी केली,पोस्ट बँक,पोस्ट विभागीय कार्यालय, संपूर्ण लातूर जिल्ह्यात बीएसएनएल चे फोर जी नेटवर्क सुरू केले.
संपूर्ण लातूर लोकसभेत ऑप्टिकल फायबर चे नेटवर्क जाळे तयार करून घेतले,सुरक्षा समिती चा जिल्हा अध्यक्ष नात्यानी मतदार संघातील सगळे ब्लैक स्पॉट शोधून त्यावर उपाय केला,विशेष असे काम लातूर लोकसभा मतदार संघातील २५ हजार शेतकऱ्या साठी पहिल्यांदा दीनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत सिंगल फेस लाइट चे कनेक्शन दिले. एक लाख कुटुंबा पेक्षा ज्यास्त परिवारला मोफत उज्वला गैस कनेक्शन दिले,लाखो लोकांचे जनधन अकाउंट बँकेत काढून दिले,केंद्र सरकारचे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम प्रभावी पणे जिल्ह्यात राबविले.या सगळ्या कामाची दखल घेऊन डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना अनेक अंतर राष्ट्रीय,राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत,संसद रत्न पुरस्कारानी,दीनदयाल उपाध्याय पुरस्कारानी यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.
सोळाव्या लोकसभेत “हायरेंज वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड “”नी हायली एज्युकेटेड मेंबर ऑफ पार्लियामेंट “ या पुरस्कारानी गौरव केला आहे.
हार्वर्ड विद्यापीठ अमेरिका मध्ये दिला जाणाऱ्या “द मोस्ट इन्स्पाइरिंग पर्सन “ या जागतिक पुरस्कारा बद्दल डॉ सुनील गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.