राज्यस्तरीय नवरत्न पुरस्काराने डॉ. आर. डी. शेंडगे सन्मानित
उमरगा, ता. उमरगा, ता. २८ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला राज्यस्तरीय नवरत्न पुरस्काराचा वितरण सोहळा गणपतीपुळे, जि. रत्नागिरी येथे नुकताच उत्साहात पार पडला. डॉ. राजू शेंडगे यांचे ज्येष्ठ बंधू दिवंगत डॉ. के. डी. शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासोबत सन २००१ पासून उमरगा येथे वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. त्यांच्या बंधुंनी या परिसरातील महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश या तीन राज्यातील सीमावर्ती भागातील अनेक रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा-सुविधा पुरवून या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. याच गोष्टीचा डॉ. आर. डी. शेंडगे यांना फायदा झाला. त्यांच्या वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाचा व त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासत या परिसरात त्यांनी देखील बंधू प्रमाणेच या परिसरात अद्यावत सेवा पुरविण्याचा वसा घेतला आहे. आज शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले अद्यावत रिसर्च सेंटर, १०० बेडची क्षमता असलेले, जिल्ह्यातील पहिले एन. ए. बी. एच., शासकीय व खाजगी कॅशलेस हॉस्पिटल, आयुर्वेदिक क्लिनिक सेवा उपलब्ध करून देऊन या परिसरात नावलौकिक मिळवित आहेत. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या मागास, गोरगरीब कुटुंबीयांना कमी खर्चामध्ये सेवा पुरविण्याचा ध्यास त्यांनी आयुष्यभर घेतला आहे. कोरोना महामारीच्या काळात तर त्यांनी कुंटूबाची आणि जीवाची पर्वा न करता या परिसरामधील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना जीवनदान देवून अहोरात्र सेवा पुरविली. तसेच उपाध्यक्ष, अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ, उमरगा, उपाध्यक्ष, शेंडगे चॅरीटेबल ट्रस्ट, उमरगा, अध्यक्ष, जयमल्हार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उमरगा या विविध संस्थांवर काम करत असताना सेवाभावीवृती डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गोरगरीब जनतेला सतत मदत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याला त्यांची पत्नी डॉ. कुमुदिनी शेंडगे या देखील रेडीओलॉजिस्ट (सोनोग्राफी तज्ञ) म्हणून त्याही साहेबांच्या कार्याला साह्य करीत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. आर. डी. शेंडगे यांना या पुरस्काराने रविवारी (ता. २६) रोजी गणपतीपुळे येथील दर्यासारंग पँलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र पत्रकार संघाच्या १७ व्या वर्धादिनाच्या सोहळ्यात आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, कृषी, उद्योग अशा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन महाराष्ट्रातील निवडक नवरत्नांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. यशपाल भिंगे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांच्या हस्ते डॉ. आर. डी. शेंडगे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागर पाटील होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, अहमदनगर जिल्हयाचे अध्यक्ष संजय नवले, राज्य संघटक प्रकाश वांजळे, दिपक पोतदार, ईगल न्युज चायनलच्या संपादिका शालन कोळेकर, सुप्रसिद्ध वक्ते माधव आंकलगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.