महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी एकदिलाने काम करून
लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे
उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करावे
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने
लातूर शहरातील महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
लातूर प्रतिनिधी : गुरूवार दि. २८ मार्च २०२४
राज्यात आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळत आहोत, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीचे तळागाळातून स्वागत होत आहे.महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही लातूर लोकसभा मतदारसंघातील घराघरात डॉ. शिवाजी काळगे यांचा प्रचार करावा एकदिलाने काम करून लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करावे, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
विद्यमान राज्य आणि केंद्र सरकारकडून समाजातील प्रत्येक घटकाचा भ्रमनिरास झाला आहे, त्यामुळे या सरकार बद्दल समाजात चीड निर्माण झाली आहे, या परिस्थितीत महाविकास आघाडीने समर्थ पर्याय जनतेसमोर ठेवला आहे. याची माहिती मतदारांना देऊन लातूर मतदारसंघातून डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी
करण्यासाठी सर्वांनी अहोरात्र परिश्रम करण्याचा निर्धार या बैठकीत
करण्यात आला आहे, असे विविधतेने नटलेल्या आपल्या देशाची एकात्मता कायम राखून सर्व घटकांचा विकास साधणे हे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे समान धोरण आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून लातूर लोकसभा काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करण्याचा निर्धार लातूर येथे झालेल्या संयुक्त बैठकीत करण्यात आला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी आदी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज व्यापक बैठक लातूर येथे पार पडली.माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवार दि. २८ मार्च रोजी दुपारी लातूर शहरातील छत्रपती चौक परिसरातील श्री राधिका कन्वेंशन हॉल येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी मंत्री विनायकराव पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार दिनकरराव माने, शिवसेना संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण,माजी आमदार ईश्वरराव भोसिकर, महाविकास आघाडी काँग्रेसचे लातूर लोकसभेचे
अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, शहर जिल्हाध्यक्ष राजा मनियार, मुक्तेश्वर धोडगे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ग्रामीण जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, पप्पू कुलकर्णी, संतोष सोमवंशी, शेतकरी कामगार पक्षाचे उदय गवारे, आमआदमी पार्टी लातूरचे अध्यक्ष प्रताप भोसले, लिंबन महाराज रेशमे, अभय
साळुंखे, उषाताई कांबळे, माजी महापौर प्रा.डॉ.स्मिता खानापुरे, आशा भिसे,सुनिता चालक, जयश्री उटगे आदीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विविध पदाधिकारी,महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीचा धर्म आपणपाळणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, लातूर लोकसभा निवडणुकीत एक दिलाने काम करीत
आहोत. डॉ. शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीच स्वागत तळागाळातून होत आहे, ही निवडणूक विचाराची आहे. आपणाला डॉ. काळगेना मतदारसंघातील घराघरात पोहोचवायचे आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात डॉ. शिवाजी काळगे यांचे पारडे
जड तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांचे पारडे जड आहे.मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, धाराशिव, हिंगोली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर लातूर नांदेड येथे काँग्रेस पक्ष, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लोकसभेच्या जागा जिंकेल असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सामान्य माणसाला राज्यातील राजकारणाचा वीट आला आहे, ही निवडणूक सामान्य माणसाने हातात घेतली आहे. प्रत्येकाने आपले बुथ गाव सांभाळावे ते बुध अधिक सक्षम करावे, आपण समाजाच्या प्रश्नासाठी राज्याच्या हितासाठी आपण काम करीत आहोत. डॉ. काळगे अनेक वर्षापासून लातूरात वैद्यकीय सेवा देत आहेत. खासदाराने आपल्याला भेटावे, निवडून आल्यावर प्रत्येक महिन्याला एका विधानसभा मतदारसंघात डॉ. काळगे महाविकास आघाडीच्या वतीने जनता दरबार घेतील, लोहा कंधारचे शेतकरी कामगार पक्षाचे
आमदार श्यामसुंदर शिंदे महाविकासआघाडी सोबत आहेत असेही त्यांनी आर्वजून सांगितले.
यावेळी बोलताना लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख म्हणाले की,महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा आपल्याला लाभला आहे. महाराजांनी बलाढ्य शक्तीशी लढून स्वराज्य
निर्माण केले. तसेच महात्मा गांधी यांच्या विचाराने इंग्रज साम्राज्य
भारतातून हद्दपार केले. त्यानंतर १९५० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. स्वराज्य, स्वातंत्र्य आणि संविधान या संकल्पनेला,विचाराला भाजप सरकार धक्के देण्याचे काम करीत आहे. या विश्वासघातकी भाजप सरकारला येणाऱ्या काळात आस्मान दाखवण्याची गरज आहे. लोकांचे काम करणे हा
काँग्रेस पक्षाचा विचार आहे. भाजप जातीय ध्रुवीकरण करून लोकांचे शोषण करणारा पक्ष आहे, या पक्षाला सत्तेपासून दूर लोटले पाहिजे. भाजपाच्याआश्वासनामुळे लोकांच्या कानाला बरे वाटले म्हणून जनतेने त्यांना निवडून दिले. पण आश्वासनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केलीच नाही. हीच ती वेळ आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला विजयी करावे. लोकांचे राज्य आणावे. मतदारांना गर्दीन गृहीत धरणाऱ्या भाजपच्या
खासदारांना 2019 मध्ये दिलेल्या आश्वासनाबदल जाब विचारला पाहिजे असे सांगून डॉ. काळगे यांना काँग्रेस व मित्रपक्षांनी एकजुटीने मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगे म्हणाले की, 2014 पासून लातूर लोकसभेसाठी माझ्या नावाची चर्चा व्हायची कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे जनतेकडून आलेल्या आग्रहामुळे मला उमेदवारी मिळाली महाविकास आघाडीची बाजू कार्यकर्त्यांनी जनतेसमोर
ठेवावी लातूर चे राजकारण संयमी उच्च दर्जाचे राहिले आहे हा सन्मान या निवडणुकीत जपायचा आहे सर्वांनी एक दिलाने लढून महाविकास आघाडीला विजयी करायचे आहे मी एक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मुलगा आहे मला सर्व प्रश्नांची जाण आहे मी नेत्रतज्ञ म्हणून अनेक वर्षापासून काम करत आहे मी अभिवचन देतो की 24 तास मी सर्वांसाठी लातूरमध्ये उपलब्ध राहील असे सांगून
त्यांनी एक डॉक्टर म्हणून लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने प्रचार करताना आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी कारण ही निवडणुक भर उन्हाळ्यात होत आहे अशी विनंती त्यांनी केली.
माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लोकांच्या मनातला उमेदवार लातूर लोकसभेला दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातले चित्रच पालटले आहे. भाजप म्हणते पहिले मी नंतर पक्ष नंतर देश असे समीकरण त्यांनी निर्माण केले आहे पक्ष फोडाफोडीचे राजकारण भाजपने
केले भाजपमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांना तोंड दाबून बुक्याचा मार मिळतो असे ते म्हणाले.
माजी आमदार दिनकरराव माने म्हणाले की, राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीअस्तित्वात आली पण त्याअगोदर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आम्ही मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जिल्ह्या महाविकास आघाडी निर्माण केली. लातूर जिल्ह्याला एक वैभव होते कुठेही गेलं
की लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जिल्ह्याचे तुम्ही का म्हणून ओळखले जायचे. लातूर जिल्ह्यातील शिवसेना फुटली नाही फक्त लाचार गद्दार लोक तिकडे गेले. डॉ. शिवाजी काळगे निवडून येणार म्हणजे येणार आहेत.शेतकऱ्यांच्या सोयाबीनला केंद्र सरकारने भाव दिला नाही, सरकारने डीएपी खतावर जीएसटी १८ टक्के लावला, त्यांची ध्येय धोरणे कार्यकर्त्यांनी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी आम्ही मरेपर्यंत शिवसेने सोबत राहणार आहोत असे सांगून त्यांनी सर्वांनी डॉ. शिवाजी काळगे यांना विक्रमी मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
माजी आमदार रोहिदास चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन प्रचार करावा, लोक आपल्याला मोठा प्रतिसाद देत आहेत. या देशासाठी भावनिक न होता सर्वांनी मतदान करावे, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मान सन्मानाचा विचार न करता एकत्र येऊन महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळजी यांना विजयी करावे ते उच्चविद्या विभूषित सुसंस्कृत सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत प्रभू श्रीराम प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत भाजप सरकार हे रामाच्या नावावर राजकारण करत आहे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात माजी आमदार ईश्वरराव भोसिकर, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, शेतकरी कामगार पक्षाचे उदय गवारे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शेटे,मुक्तेश्वर धोडगे, राजा मणियार, आदमी पार्टी लातूरचे अध्यक्ष प्रताप भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ओमप्रकाश झुरळे यांनी केले तर शेवटी आभार प्रा. संजय मोरे यांनी मानले.
—————