~ सुरक्षित व वापरण्यास सुलभ असलेल्या होमियोपथी उपचारांची दैनंदिन मार्गदर्शिका ~
मुंबई, ९ जून २०२२: पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि डॉ. बत्राज हेल्थकेअर या होमियोपथी क्लिनिक्सच्या सर्वात मोठ्या श्रृंखलेचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा यांच्या ‘होमियोपथी – सिम्पल रेमिडीज फॉर ऑल एजेस’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. घरगुती उपायांच्या माध्यमातून वेळेवर गुणकारी ठरणारी होमियोपथी समजून घेण्यासाठीची ही एक सोपी, सहज उपलब्ध असलेली मार्गदर्शिका आहे. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.
तब्बल ५० वर्षे वैद्यकीय सेवेत असलेल्या डॉ. मुकेश बत्रा यांनी सर्व वयोगटांना होणाऱ्या दैनंदिन आजारांना हाताळण्यासाठीचे उपाय या पुस्तकात दिले आहेत. हे पुस्तक अॅमेझॉनच्या साकल्य आरोग्यसेवा (होलिस्टिक हेल्थकेअर) या विभागात पहिल्या क्रमांकाचे बेस्टसेलर आहे. या पुस्तकातील उपाय सहज समजतात आणि प्रसवपूर्व आजारांपासून ते ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिससारख्या वृद्ध व्यक्तींना होणाऱ्या आजारांपर्यंत विविध आजारांवरील होमियोपथी उपचार यात दिले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील केम्प्स कॉर्नर येथील क्रॉसवर्ड येथे करण्यात आले. हे पुस्तक भारतातील आघाडीच्या सर्व बुकस्टोअर चेन्समध्ये उपलब्ध आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते गुलशन ग्रोव्हर उपस्थित होते. राकेश बेदी, मधू शाह, पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते, तारा देशपांडे, मिकी मेहता, रूपकुमार राठोड, भरत दाभोळकर, सिद्धार्थ कक, शेफ वरुण इनामदार आदी मान्यवरांनी या प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
पद्मश्री पुरस्कार विजेते आणि डॉ. बत्राज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, “होमियोपथी हा भारतातील आरोग्यसेवेचा प्राथमिक स्रोत आहे आणि वैद्यकीय उपचारांसाठी १० कोटी लोक होमियोपथीचा वापर करतात. माझ्या पाच दशकांहून अधिक असलेल्या वैद्यकीय सेवेनंतर आता लोकांच्या घरीच डॉक्टर उपलब्ध करून देऊन वैद्यकीय उपचार देणाऱ्यांचे ओझे थोड्याफार प्रमाणात कमी करणे, हा या पुस्तकाच्या माध्यमातून माझा प्रयत्न आहे.”
अभिनेते आणि प्रमुख पाहुणे श्री. गुलशन ग्रोव्हर म्हणाले, “डॉ. बत्रा हे माझे जवळचे मित्र आणि अत्यंत गुणवान व्यक्ती आहेत. माझा होमियापथीवर विश्वास आहे आणि लोकांना बरे करण्याची व त्यांचे आयुष्य बदलण्याची डॉ. बत्रा यांची क्षमता मी प्रत्यक्ष पाहिली आहे. आता या पुस्तकाच्या माध्यमातून लाखो लोकांना त्यांच्या या क्षमतेचा अनुभव घेता येणार आहे, याचा मला आनंद आहे.”
पॉप्युलर प्रकाशनचे प्रकाशक श्री. हर्ष भटकळ म्हणाले, “बेस्ट-सेलिंग लेखक आणि आधुनिक होमियोपथीचे आद्यप्रवर्तक डॉ. मुकेश बत्रा यांच्यासमवेत काम करणे हा माझा बहुमान आहे. हे पुस्तक औपचारिक प्रकाशनाच्या आधीच खूप लोकप्रिय झाले आहे आणि याच्या प्रकाशनाच्या आधीच अॅमेझॉनवर साकल्य आरोग्यसेवा विभागात हे पुस्तक पहिल्या क्रमांकाचे बेस्टसेलर आहे.”
भारतात व परदेशात होमियोपथी लोकप्रिय करण्यासाठी डॉ. बत्रा यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमध्ये नियमित स्तंभलिखाण केले आहे. ते एक बहुप्रसव लेखक असून त्यांनी विविध आवृत्त्या व भाषांमध्ये होमियोपथी या विषयावरील आठ बेस्ट-सेलर पुस्तके लिहिली आहेत. अलिकडेच त्यांनी लिहिलेल्या ‘द नेशन्स होमियोपॅथ’ या आत्मचरित्राने सर्व विक्रम मोडले आणि पहिल्या आठवड्यातच नेल्सनच्या सर्वोत्तम १० वास्तववादी (नॉन-फिक्शन) पुस्तकांच्या यादीत त्यांचे आत्मचरित्र तिसऱ्या क्रमांकावर होते.