औसा – ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचलित स्वाधार अंध-अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र, बुधोडा येथे आज महामानव , क्रांतिसूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. इतकच नव्हे तर त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ म्हणूनही ओळखलं जातं. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला.
कार्यक्रमात प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी त्यांचा मनोगतातुन महामानवाच्या विचारांवर प्रकाश टाकला. यावेळी कार्यकारी विश्वस्त . श्री. प्रशांत सुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा ज्ञानाचा उपयोग हा समाजातील गरीब, दलित अश्या विविध लोकांना सन्मानाचे जीवन देण्यासाठी केला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचार घेऊन जीवन जगण्याचा निश्चय करावा तेव्हाच आपले जीवन बदलू शकते असे यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष . श्री. हरिश्चंद्र सुडे, प्रशिक्षण केंद्राचे अधिक्षक कमलाकर बावगे, प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.