लातूर; (वृत्तसेवा) – शहरातील श्री. जानाई प्रतिष्ठानच्या वतीने ‘डॉक्टर डे’ निमित्त देण्यात येणारा “डॉक्टर जानाई श्री ” पूरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रूग्णालयातील डॉ.प्रतिभा फाटक यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, महावस्त्र,श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख रु.२५ हजार असे आहे. येत्या २० जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील ‘डॉ.भालचंद्र ब्लड बॅंके’च्या सभागृहात पुरस्कार प्रदान होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जानाई सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ.वृंदा कुलकर्णी, उपाध्यक्ष सी. ए. दिलीप रांदड, कार्याध्यक्ष नंदकिशोर कुलकर्णी, सचिव शाम देशपांडे ,या वर्षीच्या कार्यक्रमाचे पालक शाम गिल्डा तसेच जानाई विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष शार्दूल कुलकर्णी, कोषाध्यक्ष सायली कुलकर्णी, कार्याध्यक्ष बाळकृष्ण पत्की, सचिव वैभवी पत्की , सहकार्याध्यक्ष व्यंकटेश वाघ, सहकोषाध्यक्ष अनुष्का पैठणकर, सहसचिव श्रेया कुलकर्णी व मयूर पिंपळे,गौरव कुलकर्णी ,अवंतिका प्रयाग आदिंनी केले आहे.
‘सांस्कृतिक कार्यक्रमातून अभियांत्रिकी शिक्षण’ या जानाईच्या उपक्रमास लातूरकरांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जानाई प्रतिष्ठानचे संस्थापक अतुल ठॊंबरे यांनी केले आहे.