लातूरचे डॉ. नागोबा यांचा दोनशेवा शोधनिबंध
ब्रिटीश जर्नल ऑफ डरमॅटॉलॉजी मध्ये प्रसिध्द
लातूर दि. १९– सायट्रीक अॅसिड ट्रिटमेंट ऑफ इन्फेक्टेड व्हेनस एक्सिमा रिफ्रॅक्टरी टू कन्वेन्शल ट्रिटमेंट – ए नॉव्हेल अॅप्रोच या जगातील त्वचारोग व गुप्तरोग विषयावरील लातूरच्या एम.आय.एम.एस.आर. वैद्यकीय महाविद्यालयातील उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा यांचा शोधनिबंध वैद्यकीय क्षेत्रातील पत्रिका ब्रिटीश जर्नल ऑफ डरमॅटॉलॉजी मध्ये नुकताच प्रसिध्द झाला आहे. शोधनिबंधाचा २०० वा टप्पा गाठणारे डॉ. नागोबा महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयातील पहिले संशोधक ठरले आहेत.
इन्फेक्टेड व्हेनस एक्झिमा हा गचकर्ण / इसबाचा प्रकार असून यावर सद्यस्थितीत उपचार पध्दती उपलब्ध नाही. मात्र अशा या रोगावर संशोधन करून विशीष्ट प्रकारे उपचार पध्दत सुरू केल्याने रूग्ण बरा झाला व तो कायमचा आजार मुक्त झाला. या नविन उपचार पध्दतीमुळे जगातील त्वचारोगावरील वैद्यकीय पत्रिकेत डॉ. बी. एस. नागोबा यांचा २०० वा शोधनिबंध स्विकारण्यात आला आहे. या शोधनिबंधाचे डॉ. अभिजीत रायते, डॉ. अजय गावकरे, डॉ. स्मिता चाकोते, डॉ. नरेंद्र पाटील हे सहलेखक आहेत. सदरील आजाराच्या रूग्णांवर लातूर येथील एमआयटी मेडीकल कॉलेजमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
डॉ. बी. एस. नागोबा यांचा १९९ वा शोधनिबंध रोल ऑफ अॅन अॅसिडीक एनव्हायरमेंट इन द ट्रिटमेंट ऑफ डायबीटीक फुट इन्फेक्शन हा शोधनिबंध अमेरीकेतून वर्ल्ड जर्नल ऑफ डायबीटीस या पत्रिकेत प्रसिध्द झाला असून डिस्टींगविश्ड ऑथर आवॉर्ड – प्रथम क्रमांकासाठी नामांकन मिळाले आहे. बेस्ट पेपर ऑफ द इयर त्यास नामांकन मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय नामांकीत नियतकालीका मध्ये आतापर्यंत ८९ शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. तर त्यांनी लिहलेल्या २० पुस्तकापैकी ४ आंतराष्ट्रीय प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यातील १ पुस्तक चीनमध्ये एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले जात आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सभा संमेलनात डॉ. बी. एस. नागोबा यांनी प्रमुख वक्ते म्हणून वेगवेगळया विषयावार मार्गदर्शन केले आहे. आतापर्यंत ९ आंतरराष्ट्रीय, ३ राष्ट्रीय आणि १२ राज्यस्तरीय पुरस्कार देवून डॉ. नागोबा यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या यशाबद्दल डॉ. नागोबा यांचे माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. वि. दा. कराड सर, कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहूल कराड, कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड व डॉ. हनुमंत कराड, अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, प्रशासकीय व शैक्षणिक संचालिका डॉ. एस. बी. मंत्री, डॉ. बी. डी. आडगावकर, डॉ. अरूणकुमार राव, डॉ. बस्वराज वारद, डॉ. गजानन गोंधळी, डॉ. प्रदिप केंद्रे, सचिन मुंडे, विनोद जोगदंड, विश्वनाथ माने, दिपक बदणे, अर्जुन गोरे, नाना सुरवसे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.