*डॉ. काळगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल*

0
60

लक्षवेधी मिरवणूकीने

महाविकास आघाडीचे डॉ. काळगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  • अनेक मान्यवरांचा मिरवणुकीत सहभाग 
  • गंजगोलाई येथील जगदंबा मातेची विधीवत
  • पूजाअर्चा करून या मिरवणूकीला सुरूवात
  • विविध जातीधर्माचे लोक पारंपरीक 
  • वेशात मिरवणुकीत सहभागी
  • विविधतेतून एकतेचे दर्शन घडविणारे चित्र 
  • महापुरूषांच्या पुतळयास अभिवादन
  • मिरवणुकीवर ठिकठीकाणी पुष्पवृष्टी

लातूर प्रतिनिधी : लातूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज लातूर शहरातून भव्यदीव्य लक्षवेधी अतीवीशाल ऐतिहासीक मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने लातूर शहरात आजवरच्या सर्व मिरवणुकीचे रेकॉर्ड मोडल्याचे दिसून आले. 

अनेक मान्यवरांचा मिरवणुकीत सहभाग 

लातूर शहरातून निघालेल्या या मिरवणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार अमित देशमुख, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, आमदार धिरज देशमुख, माजी आमदार दिनकर माने, माजी आमदार रोहीदास चव्हाण, आशाताई शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर या मिरवणुकीत सहभागी झाले.

गंजगोलाई येथील जगदंबा मातेची विधीवत

पूजाअर्चा करून या मिरवणूकीला सुरूवात

गंजगोलाई येथील जगदंबा मातेची विधीवत पूजाअर्चा करून या मिरवणूकीला सुरूवात झाली. या मिरवणूकीत लातूर लोकसभा मतदार संघातील लोहा, कंधार तालुक्यातील अतीदुर्गम भागापासून अहमदपूर, चाकूर, उदगीर, निलंगा, शिरूरअनंतपाळ, औसा, रेणापूर, देवणी, जळकोट या सर्वच तालुक्यातून डॉ.काळगे यांना पाठींबा देण्यासाठी या मिरवणूकीत सहभागी झाले होते. 

विविध जातीधर्माचे लोक पारंपरीक 

वेशात मिरवणुकीत सहभागी

सामाजीक न्यायाची भुमिका घेऊन निवडणूक लढवत असलेले लातूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी पाठीबा देण्यासाठी विविध जातीधर्माचे लोक पारंपरीक वेशात या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यामध्ये बंजारा समाजाच्या महीला यांचे पारंपरीक नृत्य, हालगी पथक, पोतराज संबळ, धनगर समाजाचे ढोलताशे वासुदेव, वारकरी यांनी लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. 

विविधतेतून एकतेचे दर्शन घडविणारे चित्र 

डॉ. काळगे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या या मिरवणूकीत काँग्रेस, रा्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनीष्ठ पक्ष, आम आदमी, समाजवादी या व सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे झेडे घेऊन सहभागी झाले. त्यामुळे विविधतेतून एकतेचे दर्शन घडविणारे चित्र लातूरमध्ये दिसून येत होते. 

महापुरूषांच्या पुतळयास अभिवादन

महाविकास आघाडी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मिरवणूक गंजगोलाई येथून निघाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर येथ पर्यंत असलेल्या महापुरूषाच्या पुतळयांना डॉ. शिवाजी काळगे, माजी मंत्री आमदार अमित देशमुख व मान्यवर नेत्यांनी पुषपहार अर्पन करून अभिवादन केले. महात्मा गांधी चौकात महात्मा गांधी, महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आधुनीक महारा्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

मिरवणुकीवर ठिकठीकाणी पुष्पवृष्टी

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गंजगोलाई येथे जगदंबा मातेचे दर्शन घेऊन ऐतिहासीक मिरवणुकीने निघाले तेव्हा मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी त्यांच्या रथावर नागरीक, व्यापारी, विविध संघटनाचे प्रतिनिधी पुष्ववृष्टी करून त्यांना शुभेच्‍छा देण्यात येत होत्या. मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांची संख्या वरचेवर वाढत गेल्याने एकूण मिरवणुकीतील उत्साह वाढतच गेला.

लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी बाभळगाव येथे लोकप्रिय नेते, माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख साहेब, आमदार धिरज देशमुख, काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या समाधीस्थळी विनम्रपणे पुष्पांजली अर्पण केली.

——————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here