भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे परिवारासह मतदान
लातूर,( माध्यम वृत्तसेवा):– लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी परिवारासह मतदान केले.हे मतदान विकासासाठी व परिवर्तनासाठी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी मतदानानंतर व्यक्त केली.
शहरातील आदर्श कॉलनीत कम्युनिटी हॉल येथील २२१ क्रमांकाच्या बुथवर त्यांनी मतदान केले.उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, त्यांचे पती शैलेश पाटील चाकूरकर,कन्या रुद्राली पाटील चाकूरकर व रुशिका पाटील चाकूरकर,माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर असा संपूर्ण परिवार एकत्रितपणे मतदानासाठी आला होता. सर्वांनी रांगेत उभे राहत मतदान केले.
मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की,मतदानाला शहर मतदारसंघातील नागरिक उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत.हे मतदान विकासासाठी व परिवर्तनासाठी होत असल्याचे त्या म्हणाल्या. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रत्येक नागरिकाने आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले.