लातूर
मराठी विज्ञान परिषद मुंबई मार्फत समाजामध्ये विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याकरिता विविध प्रकारे कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी सुधाकर उद्धवराव आठले विज्ञान प्रसारक राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. यावर्षी या पुरस्कारासाठी लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अजय महाजन यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप रुपये २५ हजार रोख व सन्मानपत्र असे आहे. या पुरस्काराचे वितरण २४ एप्रिलला परिषदेच्या ५६ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात मुंबई येथे होणार आहे.
डॉ अजय महाजन यांच्या या निवडी बद्दल त्यांचा दयानंद विज्ञान महाविद्यालयात, दयानंद शिक्षण संस्था लातूर चे अध्यक्ष मा. लक्ष्मिरमणजी लाहोटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव मा. रमेशजी बियाणी, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयप्रकाश दरगड, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी गायकवाड, उपप्राचार्य डॉ दिलीप जगताप, पर्यवेक्षक डॉ मिलिंद माने, प्रा. बळवंत सूर्यवंशी आणि इतर अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ अजय महाजन यांच्या विज्ञान प्रसारक पुरस्कार निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो कॅपशन
डॉ अजय महाजन यांचा विज्ञान प्रसारक पुरस्कार निवडीबद्दल सत्कार करताना, दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष लक्ष्मिरमण लाहोटी. सोबत सचिव रमेश बियाणी, प्राचार्य डॉ जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ एस पी गायकवाड, पर्यवेक्षक डॉ मिलिंद माने, प्रा. बळवंत सूर्यवंशी.