आयएम वुमनसच्या कार्यशाळेस प्रतिसाद
लातूर, (प्रतिनिधी)-
व्यवसाय व उतपन्नाला आर्थिक साक्षरतेची जोड मिळाल्यास त्यातून लाभलेली आर्थिक शिस्त व स्वावलंबन अधिक फायदेशीर ठरत असते हे ओळखून येथील आयएमए वुमन्स विंगच्या वतीने महिला डॉक्टरांसाठी घेण्यात आलेल्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेस डॉक्टरांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.

अध्यक्षस्थानी विलासराव देशमुख शासकीय वैद्कीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय ओव्हळ होते. प्रमुख वक्ते डॉ. ज्ञानेश्वरा के.बी. व डॉ. प्रदिप तावडे यांनी आर्थिक व्यव्हार, गुतवणूक, गुतवणुकीचे पर्याय फसव्या योजनेपासून सावधानता, आर्थिक नियोजन याबाबत विस्ताराने माहिती दिली. उपस्थितांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांचीही त्यांनी उत्तरे दिली. आयएमए वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी राऊत यांनी आर्थिक नियोजनाबाबत आर्थिक साक्षरता गरजेची असतानाही अनेक उच्चशिक्षीत महिला स्वताचे आर्थिक नियोजन घरातील पुरुष अथवा एजंटावर सोपवतात. हे अज्ञान दूर व्हावे , त्यांनाही वीमा, शेअर मार्केट, योग्य गुंतवणूक, कर भरणा, म्यूचवल फंड आदिंची माहिती मिळावी या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.

विंगच्या सचिव डॉ. श्वेता काटकर यांनी आप आपल्या क्षेत्रात अग्रेसर बऱ्याच महिला आर्थिक नियोजनाबाबत फारशा दक्ष रहात नाहीत. त्यांनी याबाबतची माहिती घेतली तर ती त्यांच्या आर्थिक नियोजन अन उन्नतीसाठी फायद्याची ठरते . चुकीच्या फसव्या योजनांपासून होणारे त्यांचे संभाव्य नुकसान टळू शकते नेमके हे साध्य करणे हा कार्यशाळेमागचा उद्देश होता असे सांगितले. डॉ. ओव्हळ यांनी या कार्यशाळा आयोजनाबाबत विंगचे कौतूक केले.