डॉक्टरांचा सन्मान

0
263

डॉक्टर्स डे  चे औचित्य साधून लातुरात एबीपी माझाच्या वतीने

———————————————

थँक यु डॉक्टर माझा कृतज्ञता सन्मान सोहळ्यात 
डॉ. संगमेश चवंडा यांचा सन्मान 

लातूर , दि. ०१ :  डॉक्टर्स डे चे औचित्य साधून एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वतीने गुरुवारी लातुरात  थँक यु डॉक्टर माझा कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या  काळात योग्य त्या उपचार सुविधेच्या आणि कमी औषधांच्या वापराने तब्बल चार हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना तंदुरुस्त करणाऱ्या डॉ. संगमेश  चवंडा यांचा सन्मान करण्यात आला.

    लातूर शहरातील बार्शी रोड परिसरातील चवंडा हॉस्पिटलमध्ये हा थँक यु डॉक्टर माझा सन्मान सोहळा  संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य तथा  कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. गिरीश मैंदरकर, डॉ. सतीश बिराजदार, एबीपी माझाचे लातूर जिल्हा प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी  डिस्ट्रिब्युटर मोहम्मद शेख यांच्या हस्ते डॉ. संगमेश  चवंडा  यांना एबीपी माझाचे कृतज्ञता सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या काळात डॉ. संगमेश  चवंडा यांनी लातूरच्या वैद्यकीय व्यवसायाचे नांव  दैदिप्यमान करणारी अतुलनीय अशी कामगिरी केली आहे.
संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना महामारीच्या काळात कोविड च्या पहिल्या लाटेत संपूर्ण जगातील वैद्यकीय क्षेत्रात समोर उपचार कसे करावेत असा प्रश्न होता. मात्र दुसऱ्या  लाटेत यावर खूप कमी डॉक्टरांना क्लीनिकल जजमेंट करता आले.  त्याचा थेट लाभ रुग्णांना झाला.    नको त्या टेस्ट, सपोर्टिव्ह औषधे याचे प्रमाण कमी झाले . यामुळे अनेकांना खूप कमी पैश्यात उत्तम उपचार मिळाले. ही कामगिरी लातूर येथील डॉ. संगमेश चवंडा यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडून  तब्बल चार हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले. आपल्याकडे आलेल्या रुग्णाचे योग्य त्या पद्धतीने समुपदेशन करून रुग्णांच्या  मनातील आजाराविषयीची भीती कमी करण्याचे काम त्यांनी केले. त्याचा रुग्णांनाही चांगलाच फायदा झाला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना  डॉ.चवंडा यांनी कोरोनाकाळात आपल्याला आलेले अनेक अनुभव कथन केले. सेवाभावनेने आपण हे सर्व कार्य पार पाडल्याचे  त्यांनी आवर्जून नमूद केले.
डॉ. संगमेश चवंडा यांच्या या कार्यामुळे रुग्णांच्या  मनात त्यांच्याबद्दल नितांत आदराची भावना निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुक्त पत्रकार संजय जेवरीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सितम सोनवणे यांनी केले. यावेळी मुक्त पत्रकार सतीश तांदळे, विजय कवाळे , औषधी वितरक नागेश स्वामी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
———————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here