मुंबई : प्रतिनिधी
लातूर येथील जेष्ठ पत्रकार गोपाळ नारायण कुलकर्णी यांची लातूर जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे.. ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असेल अशी घोषणा डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी आज केली आहे..
गोपाळ कुलकर्णी हे माध्यम वृत्तसेवा नावाचे युट्यूब चॅनल चालवितात.. दर्जेदार युट्यूब चॅनल म्हणून वाचकांची त्याला पसंती मिळाली आहे.. गोपाळ कुलकर्णी ३० – ३५ वर्षे पत्रकारितेत सक्रीय असून विविध दैनिकातील कामाचा दांडगा अनुभव आहे..डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्ह्यात नेटवर्क उभे करून जिल्हा, तालुका शाखा स्थापन करण्याच्या सूचना गोपाळ कुलकर्णी यांना देण्यात आल्या आहेत.. एस.एम देशमुख यांनी गोपाळ कुलकर्णी यांचं अभिनंदन केलं आहे. या निवडीबद्दल गोपाळ कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
परिचय
गोपाळ नारायणराव कुलकर्णी
लातूर
जन्म तारीख : २५ आँक्टोबर.१९६१
दिलासा ( परभणी ) , मँचेस्टर व आताचा महासत्ता ( इचलकरंजी ) किसान ( इचलकरंजी ) , राष्ट्रतेज ( सांगली ) ,संचार ( सोलापूर ) ,लोकपत्र ( नांदेड ), गांवकरी ( नाशिक ) , तरुण भारत ( सोलापूर ) ,एकमत ( लातूर ) ,मराठवाडा नेता ( लातूर ) ,यशवंत ( लातूर ) आपल मन ( लातूर )
आदी विविध दैनिकात जिल्हा प्रतिनिधी, उपसंपादक , वृत्त संपादक ,कार्यकारी संपादक आदी पदावर काम
गेली ३५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रांत कार्यरत
सध्या
माध्यम वेब पोर्टल
माध्यम वृत्त यूट्यूब चँनल
माध्यम वृत्तसेवा
या समूहाचे संपादक
9422071166
prmadhyam@gmail.com