डिजिटल गाव

0
186

अभिमानास्पद.. आपल्या लातूरमधील डिजिटल गाव..!

आपल्या लातूर जिल्ह्यातील नागतीर्थवाडी हे गाव डिजिटल गाव म्हणून उदयास येत आहे. गेल्या काही वर्षात संपूर्ण देशात डिजिटल क्रांती घडत आहे. नवनवीन प्रयोगासाठी आपला मराठवाडा नेहमीच अग्रेसर असतो. डिजिटल इंडियाच्या प्रयोगात देखील आपण मागे नाही, याची साक्ष देत लातूर जिल्ह्यातील नागतीर्थवाडी हे गाव.

गावात विविध कल्पक योजनांच्या माध्यमातून डिजिटली साक्षर होण्याकडे लोकांचा कल आहे. ‘सुंदर माझे गाव’ उपक्रमांतर्गत या गावात सर्वत्र वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदीजींनी काही दिवसांपूर्वीच ‘डिजिटल करन्सी’ची घोषणा केली. याच धर्तीवर येत्या काही दिवसात संपूर्ण गावाने संपूर्ण व्यवहार डिजिटल करण्याचा संकल्प केला आहे.

सर्वात आनंदाची व महत्वाची बाब म्हणजे मुलांचे शिक्षण सुरळीत सुरू आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था ऑनलाइन झाली. अनेक गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध अडचणी आल्या. मात्र या गावातील मुलांचे शिक्षण ‘विथआऊट बफरिंग’ सुरू होते. ही विशेष आणि समाधान देणारी बाब आहे.

नागतीर्थवाडी गावाने केवळ मराठवाडाच नव्हे तर देशासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. ६०० लोकसंख्या असलेले गाव आज सव्वाशे कोटी देशवासीयांसाठी आदर्श बनले आहे. अर्थातच या सर्व सव्वाशे कोटी लोकांना हे स्वप्न सत्यात उतरवण्याची जिद्द व दृष्टी देणारे आपले पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी आहेत. मोदींजींनी दिलेला विश्वास सार्थ ठरत आज नवभारताची निर्मिती होत असल्याचे दिसुन येत आहे.

अरविंद पाटील निलंगेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here