सर्वज्ञ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरचे थाटात उद्घाटन
लातूर / प्रतिनिधी
रुग्ण सेवेसाठी डॉक्टरांनी स्वतःला वाहून घेत आपल्या ज्ञानाचा पुरेपूर लाभ रुग्णाला द्यावा व योग्य पद्धतीचे निदान लावून उपचारांती रुग्णांना बरे करावे, असे आवाहन पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका यांनी केले.
लातूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक अंबाजोगाई रोडवर सर्वज्ञ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरचे उद्घाटन पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांच्या हस्ते रविवारी (दि.17) पार पडले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज तर प्रमुख पाहुणे म्हणून आयएमए लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, डॉ. विराज मोहनराव जाधव यांचे वडील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मोहनराव जाधव, सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. जी.आर. भराडिया, नेत्ररोग तज्ञ डॉ. शिवाजीराव काळगे, सर्वज्ञ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि केअर सेंटरचे डॉ. विराज मोहनराव जाधव व डॉ. रुद्रमनी स्वामी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. कुकडे म्हणाले की, सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅड. मोहनराव जाधव यांच्यासोबत आपले स्नेहसंबंध आहेत. ज्या स्वरूपात अॅड. मोहनराव जाधव यांनी आपल्या वकिली पेशात आपले नाव सर्वदूर नेले आहे, अगदी तसेच कार्य चिरंजीव डॉ. विराज मोहनराव जाधव यांनी करावे, अशी अपेक्षा याप्रसंगी डॉ. कुकडे यांनी व्यक्त केली. सर्वज्ञ म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर. दिवसेंनदिवस ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत होतात. आपण रुग्णांप्रति सर्वज्ञ बनून त्यांना बरे करावे, असेही कुकडे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.रुद्रमणि स्वामी यांनी केले
अध्यक्षीय समारोपात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सर्वज्ञ मल्टीस्पेशालिटी आणि क्रिटिकल केअर सेंटर मध्ये अद्ययावत उपकरणे व वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत याचा फायदा रुग्णांनी घ्यावा असे ते म्हणाले डॉक्टरांनी रुग्णसेवेत आपल्या ज्ञानाचा उपयोग रुग्णांना करून द्यावा, हे सांगताना रुग्णांना योग्य सेवा आपल्याच शहरात देण्यासाठी सर्वज्ञ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरमध्ये तज्ञ अनुभवी फिजिशियन डॉ. विराज जाधव व तज्ञ अनुभवी नेफरोलॉजिस्ट डॉ. रुद्रमनी स्वामी यांनी अद्यावत उपकरणांच्या सहाय्याने रुग्णावर उपचार करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आयएमए लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे यांनी तज्ञ अनुभवी फिजिशियन डॉ. विराज मोहनराव जाधव व नेफरोलॉजिस्ट डॉ. रुद्रमनी स्वामी यांच्या अद्यावत उपचार पद्धतीचा सर्वज्ञ मल्टीस्पेशलिटी व क्रिटिकल केअर सेंटर च्या नावलौकिकास साठी फायदा होईल त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देताना त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना अॅड. मोहनराव जाधव यांनी पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांनी लातूरसारख्या शहराची निवड रुग्णसेवेसाठी केली व रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून लातूरमधील रुग्णांना सेवा दिली. पद्मभूषण डॉ. कुकडे काकांचे नाव सेवेसाठी जसे प्रसिद्ध आहे, अगदी त्याच स्वरूपात सर्वज्ञ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटरमधील तज्ञ अनुभवी डॉ. विराज मोहनराव जाधव यांनीही असेच कार्य करावे व तज्ञ अनुभवी नेफरोलॉजिस्ट डॉ. रुद्रमनी स्वामी यांनी रुग्णसेवा करताना समाज लौकिक मिळवावा व समाजहित लक्षात घेऊन रुग्णसेवा द्यावी. जेणेकरून समाजामध्ये सर्वज्ञ हॉस्पिटलचा आदर्श निर्माण होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. सुधीर मठपती यांनी केले. शेवटी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मोहनराव जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व स्तरातील नामवंत जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमानंतर शहरातील तज्ञ डॉक्टर्स, विधिज्ञ, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रातील नामवंतांनी अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असलेल्या सर्वज्ञ हॉस्पिटल आणि क्रिटिकल सेंटरला भेटी देऊन सदिच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमासाठी सर्वज्ञ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी व अॅड. ऋत्विज मोहनराव जाधव यांच्या मित्र परिवारांने परिश्रम घेतले.