निलंगा-( प्रशांत साळुंके)-साखर कारखान्याच्या माध्यमातून येथील शेतकर्यांच्या जीवनात हरितक्रांती आणण्याचे स्वप्न डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाहिले.त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आंबुलगा येथील डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज ओंकार साखर कारखाना प्रा.लि.या ठिकाणी इथेनाॅल प्रोजेक्ट उभारण्यात येत असून रविवारी ( दि.23 ) सकाळी 10 वाजता केंद्रीय मंञी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्गघाटन संपन्न होणार आहे.या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी पालकमंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
निलंगा येथील निवासस्थानी आयोजित पञकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे,तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे,तम्मा माडीबोने,संजय दोरवे,जनार्धन सोमवंशी,अभिमन्यू तुंगे,शंकरअप्पा भुरके आदी उपस्थित होते.पुढे बोलताना आ.संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले निलंगेकर साहेबांनी शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निलंगा विधानसभा मतदारसंघातून वाहणार्या तेरणा आणि मांजरा नदीवर बॅरेजेस उभारून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले.शेतकर्यांच्या जीवनात क्रांती घडावी यासाठी अतिशय कष्टातून अंबुलगा येथील माळरानावर साखर कारखान्यांच्या हातात कारखान्याची सुञे दिल्याने कालांतराने कारखाना बंद पडला.हा कारखाना परत सुरू होणार की नाही असे वाटत असताना ओंकार साखर कारखान्याच्या चेअरमन बाबुराव बोञे-पाटील यांच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेऊन अडीच महिन्यात कारखाना सुरू करून दाखवला.2500 हजार रूपये पहिला हप्ता देणारा आपला पहिलाच कारखाना ठरला.गेल्या वर्षी ऊस घेऊन जावा म्हणून शेतकर्यांना कारखानदाराकडे जावे लागत होते.परंतु, यंदा कारखानदारांना शेतकर्यांकडे यावे लागले.या बाबीचा मनस्वि आनंद आहे.
आपल्या भागातील शेतकर्यांच्या ऊसाला जादा भाव देता यावा यासाठी 150 केएल इथेनाॅल प्रकल्प,15 टिपीडी सीएनजी व 200 मेट्रिक टन सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असून दि.23 एप्रिल रोजी केंद्रीय मंञी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाघाटन सोहळा संपन्न होणार असून येत्या आठ महिन्यात काम पुर्ण करू असा मानस त्यांनी बोलून दाखविला.या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकर्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी पालकमंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
लातूर येथील महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कसल्याही परिस्थितीमध्ये लातूर येथील महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हलवू देणार नाही.याबाबत केंद्रीय मंञी नितीन गडकरी व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली असून त्यानी मला याबाबत शब्द दिला आहे.पुतळ्याबाबत लातूरकरांनी निश्चित राहावे असेही ते यावेळी म्हणाले.